MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • JioHome Plans : भारी प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये वायफाय, टीव्ही आणि OTT; पाहा जिओचा 3-in-1 प्लॅन

JioHome Plans : भारी प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये वायफाय, टीव्ही आणि OTT; पाहा जिओचा 3-in-1 प्लॅन

घरात इंटरनेट, टीव्ही आणि सिनेमे पाहण्यासाठी OTT अ‍ॅप्सचे वेगवेगळे रिचार्ज मारून तुम्ही कंटाळला आहात का? रिलायन्स जिओच्या 'JioHome' प्लॅन्समध्ये आता या तिन्ही सुविधा एकाच कनेक्शनवर मिळवण्याची भारी संधी आहे.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 29 2026, 10:14 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
जिओहोम 3 in 1 प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधा
Image Credit : Jio

जिओहोम 3-in-1 प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधा

अनेक घरांमध्ये वायफाय, टीव्ही आणि OTT सबस्क्रिप्शनसाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून रिलायन्स जिओने आपले 'JioHome' प्लॅन्स आणले आहेत. या एकाच प्लॅनमध्ये तुम्हाला वायफाय, लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि १२ पेक्षा जास्त मनोरंजन अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. जिओच्या अधिकृत वेबसाईटनुसार, JioHome सेवेमध्ये १००० हून अधिक टीव्ही चॅनेल्स उपलब्ध आहेत. यात २०० पेक्षा जास्त HD चॅनेल्सचाही समावेश आहे. पण, प्रत्येक प्लॅनमध्ये या तिन्ही सुविधा मिळतीलच असे नाही. टीव्ही, फक्त वायफाय आणि तिन्ही सुविधा एकत्र देणारे असे वेगवेगळे पर्याय यात आहेत. फक्त टीव्ही प्लॅनचा महिन्याचा खर्च साधारण ४०० रुपये येतो. तर वायफाय, टीव्ही आणि OTT एकत्र देणाऱ्या प्लॅन्सची किंमत यापेक्षा थोडी जास्त आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
फक्त टीव्ही पाहणाऱ्यांसाठी ४०० रुपयांचा प्लॅन
Image Credit : Asianet News

फक्त टीव्ही पाहणाऱ्यांसाठी ४०० रुपयांचा प्लॅन

ज्यांना घरात इंटरनेट नकोय, फक्त टीव्ही चॅनेल्स हवे आहेत, त्यांच्यासाठी JioHome TV प्लॅन एकदम बेस्ट आहे. या प्लॅनची ५ महिन्यांची फी २,००० रुपये आहे. म्हणजेच महिन्याला साधारण ४०० रुपये खर्च येतो. यामध्ये तुम्हाला १००० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, २०० पेक्षा जास्त HD चॅनेल्स आणि १५ हून अधिक प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम पाहता येतात. पात्र नवीन ग्राहकांना १२ OTT सबस्क्रिप्शन असलेली वेलकम ऑफरही मिळू शकते; पण हे प्लॅनच्या अटींवर अवलंबून असेल. ही टीव्ही सेवा वापरण्यासाठी इंटरनेट किंवा वायफायची सक्ती नाही. यासाठी तुम्हाला एक वेगळा सेट-टॉप बॉक्स दिला जातो. त्यामुळे ज्यांच्याकडे आधीच दुसरं इंटरनेट आहे किंवा ज्यांना फक्त टीव्ही हवाय, ते या प्लॅनचा विचार नक्की करू शकतात.

Related Articles

Related image1
JioFiber vs Airtel WiFi : 399चा जिओ की 499चा एअरटेल? घरच्या वायफायसाठी कोणता प्लॅन बेस्ट?
35
फक्त वायफाय हवे असणाऱ्यांसाठी कोणते प्लॅन्स आहेत?
Image Credit : Internet

फक्त वायफाय हवे असणाऱ्यांसाठी कोणते प्लॅन्स आहेत?

घरातून काम करण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अनेक डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी जिओ स्वतंत्र वायफाय प्लॅन्सही देते. अधिकृत JioHome प्लॅनच्या नियमांनुसार, तुम्ही ३० Mbps स्पीडसह ५ महिन्यांसाठी २,२०० रुपयांत इंटरनेट सेवा घेऊ शकता. याचा महिन्याचा खर्च ४४० रुपये येतो. तर १०० Mbps स्पीड असलेल्या ५ महिन्यांच्या प्लॅनची किंमत ३,००० रुपये असून, महिन्याला सरासरी ६०० रुपये पडतात. या किमती जिओने दिलेल्या माहितीवर आधारित आहेत. हे प्लॅन्स फक्त वायफायसाठी असल्याने, यात लाईव्ह टीव्ही आणि OTT सुविधा आपोआप मिळतील असा विचार करू नका. नवीन कनेक्शन घेण्यापूर्वी तुमच्या भागात जिओची सेवा उपलब्ध आहे का आणि इन्स्टॉलेशन चार्जेस आहेत का, हे नक्की तपासा.

45
वायफाय, टीव्ही आणि OTT तिन्ही एकाच प्लॅनमध्ये
Image Credit : stockPhoto

वायफाय, टीव्ही आणि OTT तिन्ही एकाच प्लॅनमध्ये

ज्यांना तिन्ही सुविधा एकत्र हव्या आहेत, त्यांच्यासाठी जिओचे 3-in-1 प्लॅन्स उपलब्ध आहेत. ३० Mbps स्पीड देणारा २,२२२ रुपयांचा प्लॅन ४ महिन्यांच्या वैधतेसह येतो. याचा महिन्याचा खर्च साधारण ५५५ रुपये होतो. तर १०० Mbps स्पीड देणाऱ्या २,१२२ रुपयांच्या प्लॅनची सुरुवातीची वैधता ३ महिने आहे; ज्याचा महिन्याचा खर्च सुमारे ७०७ रुपये येतो. या प्लॅन्समध्ये वायफाय इंटरनेट, १००० हून अधिक टीव्ही चॅनेल्स आणि १२ पेक्षा जास्त OTT अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. मात्र, २,१२२ रुपयांच्या प्लॅनसोबत मिळणारा एक महिन्याचा अतिरिक्त मोफत फायदा फक्त निवडक नवीन ग्राहकांना किंवा सोसायट्यांनाच मिळू शकतो. २,२२२ रुपयांच्या प्लॅनची अतिरिक्त वैधताही अटींवर अवलंबून आहे. त्यामुळे प्लॅनची किंमत आणि मोफत महिना यात गल्लत करू नका.

55
JioHome प्लॅन कसा मिळवायचा?
Image Credit : Asianet News

JioHome प्लॅन कसा मिळवायचा?

सर्वात आधी जिओची अधिकृत वेबसाईट https://www.jio.com/jiohome/ किंवा MyJio अ‍ॅप उघडून JioHome प्लॅन्सच्या सेक्शनमध्ये जा. तुमच्या भागात जिओ फायबर किंवा एअरफायबर सेवा उपलब्ध आहे का ते तपासा. त्यानंतर तुम्ही फक्त टीव्ही, फक्त वायफाय किंवा तिन्ही सुविधा असलेला प्लॅन निवडू शकता. नवीन कनेक्शनच्या अर्जात आवश्यक माहिती भरा आणि पेमेंट करा. इन्स्टॉलेशन, डिव्हाईस आणि सेवा सुरू होण्याचा दिवस तुमच्या पत्त्यावर आणि निवडलेल्या प्लॅनवर अवलंबून असतो. जिओच्या अधिकृत वेबसाईटवर वार्षिक प्लॅन्ससाठी मोफत इन्स्टॉलेशनची ऑफरही दिली आहे; पण ती सर्व प्लॅन्सना लागू होईलच असे नाही. थोडक्यात, घरात तिन्ही सेवा वापरणाऱ्यांसाठी JioHome एकाच प्लॅनमध्ये खर्च वाचवण्यास मदत करू शकते. तरीही, रिचार्ज करण्यापूर्वी अधिकृत साईटवर सध्याच्या किमती नक्की तपासा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Petrol Diesel Prices Today : पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, पण CNG ने दिला झटका; पाहा तुमच्या शहरातील आजचे रेट्स
Recommended image2
FASTag Annual Pass : आता फक्त 1500 रुपयांत मिळणार वार्षिक पास; 1 तारखेपासून नवा नियम
Recommended image3
Menstrual Blood Clots: मासिक पाळीत जास्त रक्तस्राव आणि गाठी का होतात? ही ५ कारणं असू शकतात
Recommended image4
Cancer In Young Adults: तरुणांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतोय? 'ही' लक्षणे अजिबात इग्नोर करू नका
Recommended image5
Mahalakshmi Rajyogam 2026 : दिवाळीपूर्वी या ४ राशींना लागणार लॉटरी! पैशांचा पाऊस पडणार
Related Stories
Recommended image1
JioFiber vs Airtel WiFi : 399चा जिओ की 499चा एअरटेल? घरच्या वायफायसाठी कोणता प्लॅन बेस्ट?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved