सार

ISRO : इस्रोच्या वैज्ञानिकांनी रिसर्चमध्ये एक नवा खुलासा केला आहे. चंद्रावरील धुव्रीय खड्ड्यांमध्ये पाण्यापासून बर्फ तयार झाल्याची शक्यता असल्याचा पुरावा मिळाला आहे.

ISRO : भारतातील वैज्ञानिकांनी चंद्रासंदर्भातील रिसर्चसाठी पुन्हा आपले नाव कोरले आहे. भारताचे ‘चांद्रयान- 3’ (Chandrayan- 3) मिशन यशस्वी झाल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरात चंद्रासंदर्भात रिसर्च सुरू आहेत. अशातच भारताला आणखी एक यश मिळाले आहे. इस्रोच्या एका अभ्यासात असे समोर आलेय की, चंद्रावरील धुव्रीय खड्ड्यांमध्ये पाण्यापासून बर्फ तयार होऊ शकतो.

दोन्ही धुव्रांच्या पृष्ठभागावर बर्फ असण्याची शक्यता
इस्रो स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या वैज्ञानिकांनी आयआयटी कानपुर, साउथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, जेट प्रोपल्शन लॅब आणि आयएसएमच्या संशोधकांच्या मदतीने एक अभ्यास केला आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, याआधी काही मीटर वर पर्यंतच्या दोन्ही धुव्रांच्या पृष्ठभागावरील बर्फाचे प्रमाण पाच ते आठपट अधिक आहे.

बर्फाच्या नमून्यांसाठी चंद्रावर ड्रिलिंग करावी लागणार
इस्रोच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, बर्फाचे नमूने घेण्यासाठी भविष्यात चंद्रावर ड्रिलिंग करण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु हे एक मोठी मिशन असेल. रिसर्चनुसार, नॉर्थ ध्रुवावर बर्फाचे प्रमाण दक्षिण धुव्रापेक्षा दुप्पट आहे.

कसा तयार होतोय बर्फ?
चंद्रावर असणाऱ्या ध्रुवीय खड्ड्यांमध्ये बर्फ असल्याच्या खुलास्यानंतर काही प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. याचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक अधिक रिसर्च करत आहेत. सध्या चंद्रावर बर्फ कसा तयार होतोय या संदर्भातील रिसर्चनुसार, चंद्राच्या धुव्रांवरील बर्फाचा मुख्य स्रोत इंब्रियन काळातील ज्वालामुखीतून निघणारा गॅस आहे. इस्रोच्या टीमने चंद्रावर बर्फ आणि त्याचा विस्तार समजून घेण्यासाठी रिकॉनिसेंस ऑर्बिटरवर रडार, लेझर ऑप्टिकल, न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर अल्ट्रा व्हॉयलेट स्पेक्ट्रोमीटर आणि थर्मल रेडियोमीटरसह सात उपकरणांचा वापर केला आहे.

आणखी वाचा : 

Aadhar Card ला असे लावा बायोमॅट्रिक लॉक, फसवणूकीच्या घटनांपासून रहाल दूर

Google च्या 20 वर्षांच्या इतिहासात वारसा कराबाबत करण्यात आले सर्वाधिक सर्च, सॅम पित्रोदाही ट्रेण्डमध्ये