- Home
- Utility News
- तुम्ही रेल्वेने प्रवास करता? आता तुम्हाला AC कोचमध्ये या रंगाची चादर मिळणार नाही! भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम
तुम्ही रेल्वेने प्रवास करता? आता तुम्हाला AC कोचमध्ये या रंगाची चादर मिळणार नाही! भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम
Indian Railways Stops Providing White Bedsheets : आता भारतीय रेल्वेच्या एसी कोचमध्ये प्रवाशांना पांढरी चादर दिली जाणार नाही. आतापर्यंत सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी कोचमधील प्रवाशांना ब्लँकेट, उशी आणि पांढरी चादर दिली जात होती.

एसी कोचमध्ये आता पांढरी चादर नाही
आता भारतीय रेल्वेच्या एसी कोचमध्ये प्रवाशांना पांढरी चादर दिली जाणार नाही. आतापर्यंत रेल्वेच्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी कोचमधील प्रवाशांना झोपण्यासाठी ब्लँकेट, उशी आणि पांढरी चादर दिली जात होती. काही गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी पांढरा टॉवेलही दिला जात असे.
आतापासून चादर मिळणार नाही
आता एसी कोचमधील प्रवाशांना पांढरी चादर दिली जाणार नाही. त्याऐवजी, त्यांना सुती कापडाचे प्रिंटेड ब्लँकेट कव्हर दिले जाईल. प्रवाशांच्या स्वच्छतेची काळजी लक्षात घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे पाऊल उचलले आहे.
पांढरी चादर अस्वच्छ असते
भारतीय रेल्वेच्या सूत्रांनुसार, एसी कोचमध्ये प्रवाशांनी वापरलेली पांढरी चादर नियमितपणे स्वच्छ केली जात नाही. ती महिन्यातून एकदा किंवा दोनदा धुतली जाते. त्यामुळे ती खूप अस्वच्छ असते. याच कारणामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून आता प्रिंटेड ब्लँकेट कव्हर दिले जाणार आहेत. प्रत्येक ब्लँकेटला कव्हर असेल.
या गाडीत झाली सुरुवात
गुरुवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जयपूर-असारवा एक्सप्रेसच्या सर्व एसी कोचसाठी प्रिंटेड ब्लँकेट कव्हरची सुरुवात केली. येत्या काळात देशातील सर्व गाड्यांच्या एसी कोचमध्ये ही योजना लागू केली जाईल, असेही म्हटले जात आहे.
रेल्वेने दिली माहिती
प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी, रेल्वेमंत्र्यांनी जयपूर-असारवा एक्सप्रेसच्या सर्व एसी क्लासमध्ये प्रिंटेड ब्लँकेट कव्हर देण्याची नवीन पद्धत सुरू केली आहे. यामुळे स्वच्छता, एकसमानता आणि प्रवासाचा चांगला अनुभव मिळेल, असे रेल्वेने एका अधिसूचनेत म्हटले आहे.

