- Home
- Utility News
- child psychology : मुलांना सतत ओरडल्यास, मारल्यास ते कसे बनतात माहित आहे का?, पालकांनो आवर्जून वाचा...
child psychology : मुलांना सतत ओरडल्यास, मारल्यास ते कसे बनतात माहित आहे का?, पालकांनो आवर्जून वाचा...
child psychology : मुलांना वाढवण्यात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण काही पालक मुलांशी खूप कठोर वागतात. ते नेहमी मुलांना ओरडतात, मारतात आणि घाबरवतात. पण पालकांच्या या वागण्यामुळे मुलांची मानसिकता कशी बदलते हे तुम्हाला माहीत आहे का?

मुलांचे मानसशास्त्र
बरेच पालक मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मारतात किंवा ओरडतात. पण तज्ज्ञांच्या मते, अशा कठोर शिक्षेमुळे मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासावर वाईट परिणाम होतो. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.
सतत ओरडा खाणारी मुले कशी असतात?
सतत ओरडल्यामुळे मुले भीतीच्या वातावरणात वाढतात. त्यांच्यात सर्जनशीलता, निर्णयक्षमता कमी होते. तज्ज्ञांच्या मते, अशी मुले भावना व्यक्त करू शकत नाहीत व सामाजिक संबंधात मागे पडतात.
मुलांचा स्वाभिमान
अशा परिस्थितीमुळे मुलांचा स्वाभिमान कमी होतो. सतत ओरडल्याने आणि शिक्षा केल्याने, त्यांच्या मनात 'मी योग्य नाही' अशी भावना येते. यामुळे ते जबाबदाऱ्या पार पाडण्यात मागे पडतात.
राग, असहिष्णुता
तज्ज्ञांच्या मते, कठोर शिक्षेला प्रेम आणि मार्गदर्शनाने संतुलित करणे महत्त्वाचे आहे. मानसिक आधार आणि सकारात्मक प्रतिसादामुळे मुलांमध्ये चांगली कौशल्ये वाढतात. सतत मारल्याने त्यांच्यात राग वाढतो.
चुकांमधून शिकण्याच्या दृष्टीने...
मुलांना शिक्षा देताना ती कठोर नसावी, तर चुकांमधून शिकवणारी असावी. ओरडणे किंवा मारल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता कमी होते. त्यामुळे प्रेमळ मार्गदर्शन आवश्यक आहे.

