Hyundai Venue गाडी नव्या रूपात मार्केटमध्ये होणार दाखल, किंमत खिशाला परवडणार
ह्युंडाईने आपल्या लोकप्रिय व्हेन्यू एसयूव्हीचा नवीन HX5 प्लस व्हेरियंट सादर केला आहे. या नवीन मॉडेलमध्ये सिंगल-पेन सनरूफ, १०.२५-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सहा एअरबॅग्जसह उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

Hyundai Venue गाडी नव्या रूपात मार्केटमध्ये होणार दाखल, किंमत खिशाला परवडणार
ह्युंडाई कंपनी त्यांच्या गाड्या घेऊन मार्केटमध्ये येत असते. आता कंपनीनं व्हेन्यू गाडी नव्या स्वरूपात समोर येणार आहे. या गाडीचे व्हेरियंट आपण समजून घेऊयात.
नवीन काय आलं अपडेट?
Hyundai Venue HX5 Plus प्रकाराच्या बाहेरील भागात छतावरील रेल, मागील वायपर आणि वॉशर आणि क्वाड-बीम एलईडी हेडलाइट्स आहेत. आतील भागात, केबिनमध्ये HX6 प्रकार आहे, ज्यामध्ये मागील विंडो सनशेड, वायरलेस फोन चार्जर, फ्रंट सेंटर आर्मरेस्ट आणि ऑटो अप/डाउनसह ड्रायव्हर पॉवर विंडो देण्यात आली आहे.
सिंगल पेन सनरूफ देण्यात आलं
HX5 प्लस व्हेरियंटमध्ये राखाडी रंगाची केबिन थीम आणि फॅब्रिक अपहोल्स्ट्री आहे, तसेच HX5 व्हेरियंटच्या सर्व विद्यमान वैशिष्ट्यांसह जसे की 10.25-इंच इन्फोटेनमेंट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो, 4-स्पीकर साउंड सिस्टम, सिंगल-पेन सनरूफ आणि मॅन्युअल एसी आहे.
सेफ्टीच्या बाबतीत कंपनी आघाडीवर
सहा एअरबॅग्ज कंपनीने दिल्या असून EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), हिल स्टार्ट असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज सारखी वैशिष्ट्ये देण्यात आल्या आहेत.
गाडी कोणाशी करणार स्पर्धा
गाडी ह्युंदाई व्हेन्यू एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही३एक्सओ, टाटा नेक्सॉन, किआ सोनेट, मारुती ब्रेझा, रेनॉल्ट किगर, किआ सिट्रोस, निसान मॅग्नाइट आणि टोयोटा टिगोर आणि मारुती सुझुकी सियाझ क्रॉसओव्हर या गाड्यांसोबत स्पर्धा करणार आहे.
किती राहील किंमत?
ह्युंडाई कंपनीची गाडी १० लाख रुपयांना पडणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या चार्जेसनुसार गाडीच्या किंमतीत फरक पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

