दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल ब्रँड ह्युंदाई मोटर इंडियाने वाढत्या इनपुट खर्चामुळे आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ही 0.6 टक्के दरवाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल.  

क्षिण कोरियन ऑटोमोबाईल ब्रँड ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.याचा बोजा वाहनधारकांवर पडणार आहे. वाढता इनपुट खर्च हे यामागील कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ह्युंदाई 1 जानेवारी 2026 पासून 0.6 टक्के दरवाढ लागू करणार आहे.

 ह्युंदाईने स्पष्ट केले आहे की, वाहन निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मौल्यवान धातू आणि इतर साहित्याच्या किमती वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात येत आहे. कच्च्या मालाच्या किमतीतील सततच्या वाढीमुळे एकूण उत्पादन खर्चावर परिणाम झाला आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाने स्पष्ट केले की, खर्च नियंत्रित करण्यासाठी आणि ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील आहे. तरीही, वाढलेला काही खर्च किमतीतील बदलांद्वारे बाजारात हस्तांतरित करण्यास कंपनी भाग पडली आहे. इनपुट खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी हे एक छोटेसे समायोजन असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अनेक कंपन्या किमती वाढवू शकतात

कंपनीने मॉडेलनुसार किमतीचे तपशील दिलेले नाहीत, परंतु ही दरवाढ ह्युंदाईच्या संपूर्ण मॉडेल पोर्टफोलिओला लागू होईल. अस्थिर वस्तूंच्या किमती आणि पुरवठ्याशी संबंधित आव्हानांमुळे अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या किमतीच्या धोरणांचा आढावा घेत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

Renault ने देखील किमती वाढवल्या

फ्रेंच वाहन निर्माता Renault ग्रुपची उपकंपनी असलेल्या Renault इंडियाने देखील जानेवारी 2026 पासून आपल्या सर्व वाहनांवर 2% पर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. JSW MG मोटर इंडिया आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया यांनीही 1 जानेवारी 2026 पासून त्यांच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीवर 2% पर्यंत दरवाढ जाहीर केली आहे.