- Home
- Utility News
- नवीन वर्षात MG Renault च्या कार एवढ्या टक्क्यांनी महागणार, TATA Maruti Hyundai चे काय?
नवीन वर्षात MG Renault च्या कार एवढ्या टक्क्यांनी महागणार, TATA Maruti Hyundai चे काय?
Renault India Announces Price Hike : नवीन वर्षात कार खरेदी करणाऱ्यांना धक्का बसणार आहे. जानेवारीपासून रेनॉच्या दरात वाढ होणार आहे. तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 31 डिसेंबरच्या आत बुक करा. वाचा मारुती, टाटा, ह्युंदाई किमती वाढवणार का?

नवीन वर्षात दरवाढीचा फटका
भारतात जीएसटी कपातीनंतर कारच्या किमती कमी झाल्याने विक्रीत विक्रम झाला होता. लहान कारवरील मोठी सवलत आणि जीएसटी कपातीमुळे अनेकांनी कार खरेदी केल्या. आता नवीन वर्षात अनेकजण कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. पण, आता त्यांना दरवाढीचा धक्का बसला आहे.
रेनॉ कारच्या किमतीत 2 टक्के वाढ
रेनॉने आपल्या कारच्या किमतीत 2 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएंटच्या एक्स-शोरूम किमतीवर 2 टक्के वाढ होईल. त्यामुळे प्रत्येक कारची किंमत वाढत आहे. व्हेरिएंटनुसार किंमत बदलेल.
एमजी नंतर आता रेनॉची दरवाढ
एमजी मोटर्सने नुकतीच भारतात दरवाढ जाहीर केली आहे. एमजी मोटर्सनेही काही टक्के दरवाढ करणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता रेनॉ इंडियानेही कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इतर कार कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकीचं काय होणार?
मारुती सुझुकीने अद्याप दरवाढीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. ह्युंदाई आणि महिंद्रा अँड महिंद्रानेही कोणत्याही प्रकारची दरवाढ जाहीर केलेली नाही. पण दोन मोठ्या कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे त्यांनी अचानक घोषणा केली तरी आश्चर्य वाटायला नको.
टाटा मोटर्सने दिले दरवाढीचे संकेत
टाटा मोटर्सने अधिकृतपणे कारच्या किमती वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. पण अलीकडेच पॅसेंजर व्हेईकल डायरेक्टर शैलेश चंद्र यांनी कारच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते. तिमाही उत्पन्नावर बोलताना शैलेश चंद्र यांनी हे संकेत दिले होते.
जीएसटी कपातीचा फायदा आता संपणार
जीएसटी कपातीमुळे कारच्या किमती कमी झाल्या होत्या. आता नवीन वर्षात कारच्या किमती वाढल्याने वाहनांच्या किमती पुन्हा वाढतील. त्यामुळे नवीन वर्षात मध्यमवर्गीयांचे कारचे स्वप्न आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

