चहा बनवताना आधी पाणी घालावे की दूध? फक्कड चवीसाठी वापरा या टिप्स
Chai making tips: भारतात चहाच्या चाहत्यांची संख्या खूप आहे. तुम्ही सुद्धा चहाप्रेमी असाल, तर चहा बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. यामुळे चहाची चव अनेक पटींनी वाढते. चांगला चहा बनवण्यासाठी आधी पाणी वापरायचे की दूध, चला पाहूया..

आधी पाणी वापरायचे की दूध?
भारतात बहुतांश सर्वांच्याच दिवसाची सुरुवात चहाने होते. नंतर दिवसभरही चहा सुरू असतो. चहाप्रेमी असाल तर तो बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. यामुळे चव वाढते. चहासाठी आधी पाणी वापरायचे की दूध, चला पाहूया.
पहिला टप्पा
चहा बनवण्यासाठी आधी भांड्यात पाणी टाका. नंतर गॅस चालू करा. पाणी चांगले उकळू द्या.
दुसरा टप्पा
पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहा पावडर टाका. चहा पावडरचा सुगंध पाण्यात उतरेपर्यंत मंद आचेवर उकळू द्या.
तिसरा टप्पा
आता तुम्हाला चहामध्ये वेलची, आले, लवंग, काळी मिरी, दालचिनी, तुळशीची पाने यासारखे औषधी गुणधर्मांनी युक्त पदार्थ घालायचे असतील, तर तुम्ही ते घालू शकता.
चौथा टप्पा
मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर साखर घाला. त्यानंतर शेवटी मिश्रणात दूध घाला.
पाचवा टप्पा
दूध घातल्यावर 2-3 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. चहाला रंग आल्यावर गॅस बंद करून गाळून घ्या. या पद्धतीने चहा बनवल्यास त्याचा रंग, सुगंध आणि चव वाढते, असे तज्ज्ञ सांगतात.

