गुगलवर असं करा सर्च, हिस्ट्रीच होऊन जाईल डिलीट
गुगलवर सर्च केलेली माहिती गुप्त ठेवण्यासाठी Incognito Mode हा एक उत्तम पर्याय आहे. या मोडमध्ये तुमची ब्राउझिंग हिस्ट्री सेव्ह होत नाही आणि कुकीज आपोआप डिलीट होतात. तसेच, तुम्ही myactivity.google.com वर जाऊन जुनी सर्च हिस्ट्री देखील डिलीट करू शकता.

गुगलवर असं करा सर्च, हिस्ट्रीच होऊन जाईल डिलीट
तुम्ही गुगलवर काही सर्च करत आणि नंतर ते सर्च हिस्ट्रीमध्ये दिसू नये असं वाटतंय का? तर ही वेब स्टोरी खास तुमच्यासाठी आहे. आपण याबद्दलची माहिती आता जाणून घेणार आहोत.
Incognito Mode म्हणजे काय?
Incognito Mode (गुप्त मोड) हा गुगलचा खास पर्याय आहे. यामध्ये सर्च केल्यावर ब्राउझिंग हिस्ट्री सेव होत नाही, सर्च हिस्ट्री दिसत नाही, कुकीज आपोआप डिलीट होतात.
New Incognito Tab निवडा
Google Chrome उघडा, वरच्या बाजूला तीन डॉट्स (⋮) वर क्लिक करा, New Incognito Tab निवडा. काळ्या रंगाची स्क्रीन दिसली? आता तुमची ती टॅब उघडली आहे.
क्रोम उघडून सुरु करा
Chrome उघडा. Ctrl + Shift + N (Windows) उघडून पहा. Command + Shift + N (Mac) आणि थेट Incognito Mode सुरू होऊन जाईल.
जुनी Google Search History कशी डिलीट कराल?
myactivity.google.com या वेबसाईटला भेट द्या. Google Account मध्ये लॉग-इन करा. Delete activity by हा पर्याय निवडा. Today / Last 7 days / All time निवडा.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
Incognito Mode मध्ये इंटरनेट प्रोव्हायडरला सर्च लपवत नाही. ऑफिस / शाळेच्या नेटवर्कवर पूर्ण गोपनीयता देत नाही. पण फोन किंवा ब्राउझर हिस्ट्रीमध्ये सर्च दिसणार नाही.

