MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Parle G Business Strategy : 1994 पासून किंमत तीच... तरीही पार्ले-जी एवढा नफा कसा कमवतं?

Parle G Business Strategy : 1994 पासून किंमत तीच... तरीही पार्ले-जी एवढा नफा कसा कमवतं?

पेट्रोल, दूध आणि किराणा सामानाचे दर गगनाला भिडले आहेत. पण चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या पार्ले-जी बिस्किटाची किंमत आजही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. कंपनी हे कसं मॅनेज करते?

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 06 2026, 10:40 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
पार्ले जी बिस्किटाची किंमत का वाढली नाही?
Image Credit : Facebook

पार्ले-जी बिस्किटाची किंमत का वाढली नाही?

भारतात चहासोबत पार्ले-जी बिस्किट खाण्याची सवय अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. कामगारांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच हे बिस्किट आवडीने खरेदी करतात. बाजारात इतर वस्तूंचे भाव वाढत असताना, पार्ले-जीची किंमत मात्र स्थिर आहे. कंपनीने किंमत न वाढवता एक खास शक्कल लढवली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यावर कंपनीने बिस्किटाची किंमत वाढवण्याऐवजी पाकिटाचे वजन कमी केले. या बिझनेस स्ट्रॅटेजीला 'श्रिंकफ्लेशन' (Shrinkflation) म्हणतात. यासोबतच ग्राहकांच्या सवयी, उत्पादन पद्धत आणि मोठ्या प्रमाणावरील विक्री यामुळे कंपनी नफा कमवते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
पार्ले-जीच्या बिझनेसचं रहस्य काय?
Image Credit : India mart

पार्ले-जीच्या बिझनेसचं रहस्य काय?

ग्राहक आजही दुकानात ५ रुपयेच देतो, पण त्याला मिळणाऱ्या बिस्किटांचे प्रमाण आता कमी झाले आहे. ५ रुपये ही रक्कम खिशातून काढायला ग्राहकांना सोपी वाटते. चहाच्या टपरीवर सुट्टे पैसे शोधण्याऐवजी लोक पटकन ५ रुपयांचे पार्ले-जी घेतात. कंपनीने किंमत वाढवली असती, तर ग्राहकांनी दुसऱ्या ब्रँडचा विचार केला असता. पार्ले कंपनीने देशभरात अनेक स्थानिक कारखान्यांसोबत करार केले आहेत. यामुळे माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचा वाहतूक खर्च वाचतो. एका पाकिटामागे मिळणारा नफा कमी असला, तरी कंपनी कोट्यवधी पाकिटे विकते आणि त्यातून मोठा फायदा मिळवते.

Related Articles

Related image1
DMart Founder : वयाच्या 48व्या वर्षी सुरू केलं डीमार्ट, राधाकिशन दमानींची भन्नाट स्टोरी
34
कंपनी नफा कसा कमवते?
Image Credit : Image: Freepik

कंपनी नफा कसा कमवते?

पार्ले-जी एका सेकंदात किती पाकिटे विकते किंवा नेमका किती नफा कमवते, याचे अधिकृत आकडे कंपनीच सांगू शकते. पण या यशामागे फक्त कमी किंमत नाही, तर त्यांची भक्कम ब्रँड आयडेंटिटी आहे. पिवळ्या रंगाचे पाकीट आणि त्यावरचा तो गोड चेहरा लोकांच्या मनात पक्का बसला आहे. लोक जेव्हा कमी बजेटमध्ये खरेदी करतात, तेव्हा ते ओळखीच्या ब्रँडलाच पसंती देतात. पार्ले-जीची ही गोष्ट फक्त एका बिस्किटाची नाही, तर उत्पादन, वितरण आणि ग्राहकांची मानसिकता अचूक ओळखणाऱ्या एका यशस्वी बिझनेस मॉडेलची आहे.

44
कमी किमतीची बिझनेस स्ट्रॅटेजी
Image Credit : our own

कमी किमतीची बिझनेस स्ट्रॅटेजी

एक छोटेसे बिस्किटाचे पाकीट एवढी मोठी बाजारपेठ कशी तयार करू शकते, याचे पार्ले-जी हे एक उत्तम उदाहरण आहे. महागाई वाढली की वस्तूचे भाव वाढवणे हा एकच पर्याय नसतो. उत्पादन खर्च कमी करणे, वाहतुकीत बचत करणे, पाकिटाचा आकार बदलणे आणि जास्तीत जास्त विक्री करणे, असे अनेक मार्ग कंपन्या वापरतात. आजही पार्ले-जीचे पाकीट पाहिल्यावर ग्राहकांना त्याची किंमत लगेच आठवते, हेच या ब्रँडचे सर्वात मोठे यश आहे. एका साध्या बिस्किटाच्या पाकिटात किंमत आणि ग्राहकांचे मानसशास्त्र समजून घेण्याचा एक मोठा धडा दडलेला आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maruti Suzuki Victoris : मारुती सुझुकीच्या Victoris SUV वर बंपर डिस्काउंट, मायलेज 28 kmpl पार
Recommended image2
Economic Crisis : आर्थिक संकटातही राहायचंय सेफ? हे ४ गोल्डन रूल्स तुमच्यासाठीच आहेत!
Recommended image3
Viral Video : 7 दिवसांत 4.5 लाखांची कमाई; दिल्लीच्या मेकअप आर्टिस्टचा व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
Aprilia SXR GT Launch : स्टायलिश लूक आणि 14 इंचांचे व्हील्स, अप्रिलियाचे नवीन स्कूटर्स भारतात लाँच
Recommended image5
Credit Card EMI : क्रेडिट कार्ड EMI की पर्सनल लोन? व्याज निम्म्याने कमी करण्याच्या सिक्रेट टिप्स
Related Stories
Recommended image1
DMart Founder : वयाच्या 48व्या वर्षी सुरू केलं डीमार्ट, राधाकिशन दमानींची भन्नाट स्टोरी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved