फ्लॅट खरेदीत बिल्डर तुम्हाला कसं लुटू शकतो, हे समजून घ्या, कारण मुंबई, पुणे शहरात रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी मंदी आहे, पण ती बाहेर समजू दिली जात नाही, त्यामुळे घर आवश्यक असेल तर नक्कीच घ्या, पण या काही ट्रीक वापरा, यात अखेर आर्थिक फायदा हा तुमचाच होणार आहे.
मुंबई : मुंबई, पुण्यात तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत आहात, घर म्हणजे फ्लॅट. MUMBAI PUNE REAL ESTATE जर फ्लॅट खरेदी करण्यासाठी जाल, तेव्हा बिल्डरने मार्केटिंगला लावलेली माणसं तुमचा नंबर लिहून घेतील. यानंतर तुम्ही फ्लॅट पाहून असं सांगाल की आम्ही विचार करु, तुमच्या डोक्यात बजेट कसा जमवायचा, एवढे पैसे आणायचे कुठून, गोल्ड लोन, पगारावार मिळणारं कर्ज, पीएफचा पैसा काढू का असे खूप विचार सुरु होतील. पण या आधी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे हे मुद्दे लक्षात ठेवा.

पहिली गोष्ट रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी मंदी आहे, घरं घ्यायला लोकांकडे बजेट नाही, ज्यांच्याकडे आहे, त्यांचे व्यवहार कसे आहेत, ते कसे एवढे पैसे देऊ शकतात, वैगरे वैगरे पडणारे प्रश्न सोडून द्या. पण तुमच्या रोजच्या कष्टाचे पैसे, वाचवणं खूप गरजेचं आहे.
तुम्ही एकदा का एखाद्या बिल्डरकडे जावून आलात, तर तुम्हाला शहरातून इतर प्रोजेक्टचे देखील फोन यायला सुरुवात होईल. कारण मार्केटिंगसाठी कामं करणारी मुलं हे एकमेकांना नंबर शेअर करतात. रिअल इस्टेटमध्ये वाढत्या मंदीमुळे घर विकण्यासाठी, त्यांच्या भाषेत ग्राहकाला गंडवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. तुम्हाला खूप सारे पर्याय सांगितले जातील. पण आमचा बजेट नाही, असंच उत्तर द्या.
यानंतर साधारण महिना होईल, तोपर्यंत विचलित होऊ नका. यानंतर तुम्हाला वेगवेगळी आकर्षणं दिली जातील, जसं की या प्रोजेक्टमध्ये शेवटचे २ फ्लॅट शिल्लक आहेत, ते इन्व्हेस्टर आहेत. त्यांना विकायचा आहे, आजूबाजूचे शेजारी, त्यांची जात धर्म यावरही तुम्हाला आकर्षण निर्माण केलं जाईल, पण कोणतंही नाव न घेता.
तुम्हाला पार्किंग चार्जेस, पझेशन चार्जेस लावले जातील. जीएसटी लावला जाईल, पण नियम दाखवल्यावर हे तुम्हाला लागू नाही, हे कळाल्यावर आणि तुम्ही त्यांना सांगितल्यावर लाखो रुपये कमी केले जातील. ग्राहकाचा बजेट कमी पडतोय, हे समजल्यावर मुंबईसारख्या ठिकाणी ५ लाख ते ४० लाख रुपये कमी केल्याची उदाहरणं आहेत. न लाजता भाजीपाला खरेदी करतात, त्यापेक्षाही जास्त घासाघीस करा. घर बूक करणयापेक्षा थेट खरेदी करा. रेडी पझेशन घ्या. मुंबईत १० - १० वर्ष झालीयत लोकांना पैसे भरुन घराचा ताबा नाहीय.
तुम्हाला घरंही घ्यायचं आहे, गरज आहे, पण बजेटपुढे काहीही चालत नाहीय, अशी परिस्थिती बिल्डरच्या मार्केटिंग टीमसमोर उभी करा, ते बजेट आपोआप खाली आणतात. पझेशन, एनओसी मिळालेल्या घराला जीएसटी लागत नाही. तरीही अनेक वेळा त्या नावाखाली पैसे वाढवले जातात. तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरली तरी तुमचे लाखो रुपये वाचतील, निदान १ ते २ वर्षाचं पगाराचं पॅकेज, यात तुमची स्टॅम्प ड्युटीचे पैसेही सहज वाचतील.

