MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Hero Motors IPO : हिरो मोटर्सचा आयपीओ खुला.. ईव्हीची जोरदार वाढ, पण व्हॅल्युएशनचं काय?

Hero Motors IPO : हिरो मोटर्सचा आयपीओ खुला.. ईव्हीची जोरदार वाढ, पण व्हॅल्युएशनचं काय?

हिरो मोटर्सचा १००० कोटी रुपयांचा आयपीओ बुधवार (१६ सप्टेंबर) पासून खुला झाला आहे. कंपनीच्या ईव्ही सेगमेंटमध्ये वेगाने वाढ होत असली तरी, त्यांच्या व्हॅल्युएशनमध्ये कशी वाढ झालीये हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग, याचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 17 2026, 03:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
हिरो कंपनीचा आयपीओ
Image Credit : Chatgpt

हिरो कंपनीचा आयपीओ

ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स आणि पॉवरट्रेन बनवणाऱ्या हिरो मोटर्सने १००० कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला आहे. हा आयपीओ १६ सप्टेंबरला खुला झाला असून १८ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येईल. कंपनीने एका शेअरची किंमत ७९ ते ८४ रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना किमान १७८ शेअर्स आणि त्यानंतर त्याच्या पटीत बोली लावावी लागेल.

या आयपीओमध्ये ६०० कोटींचे फ्रेश शेअर्स आणि ४०० कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) आहे. ओएफएसद्वारे प्रमोटर ओपी मुंजाल होल्डिंग्स आणि हिरो सायकल्स आपला वाटा विकत आहेत. अप्पर प्राइस बँडनुसार कंपनीचे मार्केट कॅप ३,८१५ कोटी रुपये आहे. यातून मिळणाऱ्या निधीपैकी १९० कोटी रुपये कर्जफेडीसाठी आणि २०० कोटी रुपये गौतम बुद्ध नगर कारखान्यातील पॉवरट्रेन क्षमता वाढवण्यासाठी वापरले जातील.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
गुंतकवणूकदारांकडून मोठा सहभाग
Image Credit : X/HeroMotoCorp

गुंतकवणूकदारांकडून मोठा सहभाग

आयपीओ खुला होण्याच्या एक दिवस आधी, १५ सप्टेंबरला हिरो मोटर्सने अँकर गुंतवणूकदारांकडून २९९.९९ कोटी रुपये उभे केले. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना ८४ रुपये प्रति शेअर या दराने ३.५७ कोटी शेअर्स दिले आहेत. यातील जवळपास ८२ टक्के वाटा ७ देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्यांनी १६ स्कीम्सच्या माध्यमातून खरेदी केला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, एडलवाइज लाइफ इन्शुरन्स, सोसायटी जनरल, ३पी इंडिया इक्विटी फंड आणि एएसएएस ग्लोबल फंड यांसारख्या बड्या संस्थांनी यात गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल स्मॉलकॅप, कोटक एमएनसी आणि जेएम फ्लेक्सी कॅप फंड आघाडीवर आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, डॅम कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर केफिन टेक्नॉलॉजीज रजिस्ट्रार आहे. हे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होतील.

Related Articles

Related image1
Bike Stunts: रिल्ससाठी जीवघेणा खेळ, बंगळूरुच्या भरधाव हायवेवर तरुणांची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
Related image2
Bike Parcel : ट्रेनने बाईक दुसऱ्या शहरात पाठवताय? हे नियम आणि कागदपत्रं माहित नसतील तर बसेल मोठा फटका
35
हिरो मोटर्सचा व्यवसाय
Image Credit : Gemini

हिरो मोटर्सचा व्यवसाय

हिरो मोटर्सचा व्यवसाय दोन मुख्य विभागांत विभागला आहे. पहिला पॉवरट्रेन सोल्युशन्स, ज्याने FY26 मध्ये ५३.७ टक्के महसूल दिला. यात गिअर्स, ट्रान्समिशन आणि बाईक पॉवरट्रेनचा समावेश आहे. दुसरा विभाग अलॉयज आणि मेटॅलिक्स (A&M) आहे, ज्यातून ४६.३ टक्के महसूल आला. यात स्टँड, स्विंग आर्म्स आणि इंजिन गार्ड्स बनवले जातात. कंपनी २३ देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. FY26 मध्ये आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून ४१.४ टक्के महसूल मिळाला. बीएमडब्ल्यू, डुकाटी, फॉर्म्युला मोटरस्पोर्ट आणि हमिंगबर्ड ईव्ही यांसारख्या दिग्गज कंपन्या त्यांचे क्लायंट आहेत.

एकूण महसुलाची वाढ संथ असली तरी, ईव्ही बिझनेस मात्र सुसाट धावतोय. FY24 मधील १२८ कोटींचा ईव्ही महसूल FY26 मध्ये ४६.१ टक्के सीएजीआरने २७३ कोटींवर पोहोचला. FY26 मध्ये वाढलेल्या ९९ कोटींच्या अतिरिक्त महसुलापैकी ९८ कोटी फक्त ईव्ही विभागातून आले आहेत. पॉवरट्रेन मार्जिन १६.३ टक्क्यांवर गेले आहे. पण A&M विभाग FY24 मधील २९.९ कोटींच्या नफ्यावरून FY26 मध्ये १५.९ कोटींच्या तोट्यात गेला आहे.

45
कंपनीचा महसूल
Image Credit : X/HeroMotoCorp

कंपनीचा महसूल

कंपनीचा एकूण महसूल FY24 मधील १,०६४ कोटींवरून FY26 मध्ये १,१८८ कोटींवर पोहोचला (दोन वर्षांचा सीएजीआर ५.७%). याच काळात एबिटडा (EBITDA) ८६.३ कोटींवरून १४७.८ कोटींवर (३०.९% सीएजीआर) आणि निव्वळ नफा (PAT) १७ कोटींवरून ४१.२ कोटींवर (५५.५% सीएजीआर) वाढला. FY26 पर्यंत कंपनीवर एकूण ४००.८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

गौतम बुद्ध नगर प्लांट FY26 मध्ये ८८.३ टक्के क्षमतेने काम करत असल्याने, तिथे २०० कोटी रुपये खर्चून विस्तार केला जातोय. मात्र, परदेशातील कारखान्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाहीये. थायलंड प्लांटचा वापर FY24 मधील १२ टक्क्यांवरून FY26 मध्ये ३.९ टक्क्यांवर घसरला आणि तिथे ६.७ कोटींचा तोटा झाला. युके प्लांटची क्षमताही फक्त २४.२ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे रिपोर्ट्स सांगतात.

55
हिरो कंपनीच्या आयपीओचा प्रवास
Image Credit : X/HeroMotoCorp

हिरो कंपनीच्या आयपीओचा प्रवास

हिरो मोटर्सच्या आयपीओचा प्रवास यापूर्वी दोनदा बदलला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये ९०० कोटींसाठी ड्राफ्ट पेपर दाखल केले आणि ऑक्टोबरमध्ये ते मागे घेतले. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये १,२०० कोटींसाठी अर्ज केला आणि आता शेवटी १,००० कोटींचा आयपीओ बाजारात आणला आहे.

FY26 च्या कमाईनुसार कंपनीचा पी/ई (P/E) रेशिओ ९२.७ पट आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा सरासरी पी/ई रेशिओ फक्त ४६.७ पट आहे. याचा अर्थ हिरो मोटर्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा दुप्पट व्हॅल्युएशनची अपेक्षा करत आहे. FY26 मध्ये रिटर्न ऑन नेट वर्थ ८.६ टक्के आहे. ईव्ही विभाग चांगली कामगिरी करत असला तरी, नॉन-ईव्ही व्यवसायातील मंदी, A&M मधील तोटा आणि परदेशी युनिट्सचा कमी वापर या सर्व कारणांमुळे हे व्हॅल्युएशन खूप जास्त असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(54.0 ov) 99 & 156/4
Day 4
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Gold Silver Prices Today : 22 ऑक्टोबरचे सोन्या-चांदीचे नवे दर, मुंबईसह प्रमुख शहरांतील रेट्स तपासा
Recommended image2
Petrol Diesel Prices : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत? प्रमुख शहरांतील रेट्स तपासा
Recommended image3
Home Loan Top Up Eligibility: होम लोन टॉप-अपसाठी तुम्ही पात्र आहात का? या ५ सोप्या स्टेप्समध्ये तपासा
Recommended image4
Flipkart Food Delivery : झोमॅटो, स्विगीला टक्कर...फ्लिपकार्टची फूड डिलिव्हरीमध्ये एन्ट्री, 8000 कर्मचाऱ्यांवर टेस्टिंग सुरू
Recommended image5
Tesla SpaceX Merger: टेस्ला आणि स्पेसएक्स एकत्र येणार? ३.५ ट्रिलियन डॉलरची महाकाय कंपनी बनण्याची शक्यता
Related Stories
Recommended image1
Bike Stunts: रिल्ससाठी जीवघेणा खेळ, बंगळूरुच्या भरधाव हायवेवर तरुणांची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
Recommended image2
Bike Parcel : ट्रेनने बाईक दुसऱ्या शहरात पाठवताय? हे नियम आणि कागदपत्रं माहित नसतील तर बसेल मोठा फटका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved