Health Tips : रात्री चांगली झोप हवी आहे? मग हे उपाय करून पाहा; नक्की फायदा होईल!
Health Tips : अनेक कारणांमुळे शांत झोप लागत नाही. कधी कधी मधेच जाग आल्यावर पुन्हा झोप लागत नाही. झोपेच्या कमतरतेचे कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. तथापि, चांगली झोप लागण्यासाठी सहाय्यभूत अशा काही पेयांबद्दल जाणून घेऊया.

रात्री चांगली झोप लागण्यासाठी चांगली पेये
रात्री चांगली झोप लागण्यासाठी मदत करणाऱ्या काही पेयांबद्दल जाणून घेऊया.
हळदीचे दूध
दुधातील कॅल्शियम झोप लागण्यास मदत करते. हे 'मेलाटोनिन' हार्मोन तयार करणाऱ्या 'ट्रिप्टोफॅन'ला मेंदूपर्यंत पोहोचवते. हळदीतील कर्क्युमिनमुळेही चांगली झोप लागते.
तुळशीचा चहा
रात्री तुळशीचा चहा प्यायल्यानेही चांगली झोप लागण्यास मदत होते.
पेपरमिंट टी
पेपरमिंटच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स चांगली झोप लागण्यास मदत करतात. त्यामुळे रात्रीच्या आहारात पेपरमिंट टीचा समावेश करू शकता.
बदाम मिल्क
बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिनच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे रात्री बदामाचे दूध प्यायल्याने चांगली झोप लागते.
चेरी ज्यूस
झोपेची समस्या दूर करणारा 'मेलाटोनिन' हा घटक चेरीमध्ये भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे चेरीचे ज्यूस प्यायल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते.
किवी ज्यूस
जास्त अँटीऑक्सिडंट असलेले किवी फळ झोप लागण्यास मदत करते.
लक्षात ठेवा :
एखाद्या तज्ज्ञ न्यूट्रिशनिस्ट किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच आहारात बदल करा.

