Health Tips : अनेकदा कितीही दमूनभागून घरी आले तरी, शांत झोप लागत नाही. सारखी कूस बदल राहतो. मग अशावेेळी काय करायचे? नाश्त्यात ओट्सचा समावेश करून पाहा. ओट्स एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
Health Tips : आजकाल सर्वत्र कामाचा ताण वाढत असल्याचे चित्र आहे. प्रत्येकाला कामाचे टार्गेट निर्धारित करून दिले आहे. टार्गेटच्या मागे लागल्यामुळे मानसिक ताण वाढणे, वेळी अवेळी जेवण करणे. भूक शमविण्यास जंक फूडचा आधार घेणे असे प्रकार होत आहेत. एकूण बहुतांश सर्वांचीच जीवनशैलीच बदलली आहे. कामाच्या व्यापामुळे अनेकजण रात्री उशिरा घरी येतात. मग पुरेशी झोप होत नाही. नंतर हे रुटीन होते. यातूनच अनेकदा शांत झोप लागत नाही.
झोपेची कमतरता ही अनेक लोकांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. अपुऱ्या झोपेमुळे हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश केल्यास रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते.
ओट्स एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. जॉन्स हॉपकिन्सच्या एका अभ्यासानुसार, ओट्स पचायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे झोपण्यापूर्वी ओट्स खाणे फायदेशीर ठरू शकते.
जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त असलेले ओट्स अतिरिक्त भूक लागण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी आहेत. ओट्स खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होते. याशिवाय, ते प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि नियासिनसह विविध पोषक तत्वे पुरवतात. ओट्समध्ये व्हिटॅमिन ए, बी 12 आणि डी देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. रात्रीच्या जेवणात ओट्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या विविध समस्या टाळता येतात.
ओट्ससोबत शिजवलेल्या भाज्या खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. भाज्या शिजवून, त्यावर थोडे मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून ओट्समध्ये मिसळून किंवा नुसतेही खाऊ शकता. हे आरोग्यदायी आणि चविष्ट लागते. रात्रीच्या जेवणात ओट्सची स्मूदी बनवून प्यायल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन फायबर असते, जे रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करते आणि आतड्यांच्या आरोग्याला आधार देते. पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट्स, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारी आवश्यक खनिजे (झिंक, सेलेनियम) आणि अमिनो ॲसिडमुळे ओट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.


