अक्रोड रात्रभर भिजवून ठेवा, उपाशापोटी सकाळी खा, हृदयाच्या आरोग्यासह पॉवर वाढेल!
Health Benefits of Eating Soaked Walnuts : अक्रोड केवळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मेंदूची शक्ती वाढवण्यासाठीच नाही, तर इतर अनेक आरोग्य फायदे देखील देतात. रात्रभर भिजवलेले अक्रोड सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास आरोग्य फायदे दुप्पट होतात...

अक्रोड
अक्रोड हे सर्वात महागड्या बियांपैकी एक आहे. त्याची चवही थोडी कडू लागते. त्यामुळे अनेकजण ते विकत घ्यायला उत्सुक नसतात. पण, किंमत जास्त असली तरी त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तज्ज्ञ सांगतात की दिवसातून किमान दोन अक्रोड खाल्ले पाहिजेत. भरपूर पोषक तत्वे असल्यामुळे अक्रोडला सुपरफूड म्हटले जाते. रोज एक किंवा दोन अक्रोड खाल्ल्याने हृदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया, रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास काय होते...
अक्रोड फक्त भिजवूनच का खावेत?
तज्ज्ञांच्या मते अक्रोड नेहमी भिजवूनच खाल्ले पाहिजेत. यामध्ये असलेले काही एन्झाइम्स भिजवल्यानंतर खाल्ल्यास सहज पचतात. म्हणूनच ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. भिजवून खाल्ल्याने पोषक तत्वे कमी होतात, हा एक गैरसमज आहे. इतकेच नाही, तर अक्रोड भिजवल्याने त्यातील फायटिक ऍसिड कमी होते. हे ऍसिड शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे शोषून घेण्यापासून रोखते. अक्रोड भिजवल्यामुळे शरीर जीवनसत्त्वे आणि खनिजे सहजपणे शोषून घेऊ शकते.
ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्...
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात. ते आपल्या मेंदूच्या पेशींसाठी आवश्यक आहेत. दररोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. विशेष म्हणजे, त्यात आढळणारे आरोग्यदायी फॅट्स रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी खूप मदत करतात.
मधुमेह आणि बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्यांसाठी भिजवलेल्या अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच, त्यात असलेल्या फायबरमुळे मधुमेहींसाठी ते खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर हळूहळू रिलीज होते आणि साखरेची पातळी वाढण्यापासून रोखली जाते.
हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले
अक्रोडमध्ये चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) पातळी कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे शरीराची पॉवर वाढते. शरीराला ताकद मिळते.
झोपेच्या समस्या कमी करते, तणाव नियंत्रित करते
अक्रोड मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते, जो आपल्या झोपेचे नियमन करणारा नैसर्गिक हार्मोन आहे. जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने तणाव कमी होण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी...
अक्रोडमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. हे जास्त खाणे टाळण्यास मदत करते आणि वजन नियंत्रणात ठेवते.
केस आणि त्वचेच्या चमकसाठी
अक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते. अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् तुमचे केस मजबूत करतात आणि त्वचा चमकदार बनवतात.
मजबूत हाडांसाठी...
अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात, जी आपली हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत. भिजवलेले अक्रोड खाणे वृद्धापकाळात हाडांच्या समस्या टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी २ ते ४ अक्रोड पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खा.
इतर फायदे
दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन अक्रोड खाण्याची सवय लावल्यास, तरुणांमध्ये अकाली वृद्धत्वाची प्रक्रिया रोखण्यास आणि चेहऱ्याची चमक वाढविण्यात मदत होते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले व्हिटॅमिन ई सौंदर्य वाढविण्यात मदत करते.

