- Home
- Utility News
- LPG Gas Cylinder: २२ सप्टेंबरपासून LPG गॅस सिलेंडर स्वस्त होणार?, सरकारच्या जीएसटी कपातीनंतर ग्राहकांना दिलासा मिळेल का?
LPG Gas Cylinder: २२ सप्टेंबरपासून LPG गॅस सिलेंडर स्वस्त होणार?, सरकारच्या जीएसटी कपातीनंतर ग्राहकांना दिलासा मिळेल का?
LPG Gas Cylinder: केंद्र सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला, जो २२ सप्टेंबरपासून लागू होईल. तथापि, या जीएसटी कपातीचा एलपीजी गॅस सिलेंडरवर कोणताही परिणाम होणार नाही, त्यामुळे घरगुती, व्यावसायिक सिलेंडरचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील.

२२ सप्टेंबरपासून गॅस सिलेंडर स्वस्त होणार का?
LPG Gas Cylinder: एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सतत बदलत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात कायमच उत्सुकता असते. यावेळीही तोच प्रश्न विचारला जात आहे. २२ सप्टेंबरपासून गॅस सिलेंडर स्वस्त होणार का?
सरकारने जीएसटी (GST) कपात करण्याचा घेतला निर्णय
केंद्र सरकारने नुकताच अनेक आवश्यक वस्तूंवरील आणि दैनंदिन वापरातील उत्पादनांवरील जीएसटी (GST) कपात करण्याचा निर्णय घेतला होता. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिल बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, यापूर्वी लागू असलेले १२% आणि २८% जीएसटी स्लॅब हटवून नवीन दर फक्त ५% आणि १२% ठेवण्यात आले आहेत. ही कपात २२ सप्टेंबरपासून लागू होत असून, त्याचा परिणाम अनेक वस्तूंवर दिसणार आहे.
सिलेंडरवर जीएसटी काय आहे?
घरगुती एलपीजी सिलेंडरवर फक्त ५% जीएसटी आधीपासूनच आकारला जातो.
व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर मात्र तब्बल १८% जीएसटी आहे.
मग सिलेंडरचे दर कमी होतील का?
येथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, जीएसटी कौन्सिलने एलपीजीसाठी कोणताही बदल जाहीर केलेला नाही. म्हणजेच, २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या एकूण जीएसटी कपातीचा फायदा गॅस सिलेंडरच्या भावावर होणार नाही.
ग्राहकांना काय?
घरगुती सिलेंडरची किंमत जैसे थे राहणार आहे. व्यावसायिक वापरातील सिलेंडरच्या किंमतीतही कोणताही बदल होणार नाही. अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक्स, कंझ्युमर ड्यूरेबल वस्तूंमध्ये मात्र कपातीचा फायदा २२ सप्टेंबरनंतर ग्राहकांना मिळेल. म्हणजेच, इतर अनेक वस्तू स्वस्त होणार असल्या तरी गॅस सिलेंडरचे दर पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.

