Gold - Silver Rate Today : सोने - चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय बाजारातही सोन्याचा भाव वाढला आहे. तर चांदीचा दर देखील वधारला आहे.
नवी दिल्ली : आज सोने - चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारात अर्थात अमेरिकेच्या कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव वाढला आहे. गुंतवणुकदारांकडून सोन्याची मागणी वाढती असल्याने दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय दरांसह भारतातही सोने - चांदीत वाढ झाली आहे.
भारतीय सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा दर ०.३७ टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीसह ३० जुलै रोजी, गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४२,५३० रुपये १० ग्रॅम इतका आहे.
काल बुधवारी सराफा बाजारात २४ कॅरेटचा भाव १,४२,००५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच आज सोन्याचा भाव ५२५ रुपयांनी वाढला आहे.
२२ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
भारतीय सराफा बाजारात आज २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,३३,९९० रुपये आहे. कालच्या तुलनेत आज २२ कॅरेटचा भाव ४९५ रुपयांनी वाढला आहे.
तर आज १८ कॅरेटचा भाव ४०५ रुपयांनी वाढला आहे. आज १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किमत १,०९,६३० रुपये आहे.
चांदीचा दर काय?
आज ३० जुलै रोजी चांदीचा भाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा भाव वाढला आहे. तर घरगुती बाजारातही चांदीच्या किमती वाढल्या आहेत. आज चांदीच्या किमतीत ०.७७ टक्क्यांची वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात १० ग्रॅमसाठी २१७० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह चांदीची भाव आज २,१७,००० रुपये इतका आहे.

