सोने-चांदीच्या दरात सतत घसरण होत असून आज पुन्हा एकदा सोन्याचा दर खाली उतरला आहे. आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा दर कमी झाला असून चांदीचाही भाव कमी झाला आहे. 

मुंबई : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून मौल्यवान धातूच्या किमती सतत कमी होत आहेत. आज बुधवारीही सोने-चांदीचा दर कमी झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर बुधवारी सराफा बाजार उघडल्यानंतर लगेच तासाभरातच सोन्याचा भाव सकाळी जवळपास 2400 रुपयांनी कमी झाला. तर चांदीचा भाव तब्बल ४००० रुपयांनी उतरला आहे. त्यानंतर काही वेळात दोन्ही मौल्यवान धातूनच्या दरात काहीशी सुधारणा झाली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आजचा सोन्याचा भाव काय?

महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना सोनं-चांदी खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी सध्या कमी झालेल्या किमतीमुळे खरेदीची चांगली संधी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून अर्थात सोमवार आणि मंगळवारीही सोने-चांदीचा भाव खाली उतरला होता. त्यानंतर आज आठड्याच्या तिसऱ्या दिवशीही सोने दर कमी झाली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमसाठी १६०० रुपयांनी कमी होत तो १,४४,९१८ रुपयांवर व्यवहार करत होता. तर चांदीचा भाव १००० रुपयांनी कमी होत तो २,२४,७९३ रुपयांवर आहे.

मुंबईत आज सोन्याचा २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,३३० इतका आहे. तर २२ कॅरेटचा भाव १,३२,३०० रुपये इतका आहे. तर १८ कॅरेट सोनं १०८२५० रुपये आहे.

सोने-चांदी दरात घसरण का?

बुधवारी सोने-चांदीच्या किमतीत घसरण होण्यामागे डॉलरचा वाढलेला भाव हे कारण सांगण्यात आलं आहे. डॉलर इंडेक्स वाढून तो १०१.२६५ च्या स्तरावर पोहोचला आहे. हा दर मागील जवळपास १२ महिन्यांतील डॉलर इंडेक्सचा सर्वात उच्चांकी स्तर आहे.

शिवाय इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध, संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे महागाईचा धोका निर्माण झाला आहे. यामुळेच जगभरातील अनेक मध्यवर्ती बँका त्यांचे व्याजदर वाढवण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. व्याजदर वाढण्याच्या चर्चेमुळे याचा परिणाम सोने-चांदीच्या दरांवर निर्माण होत आहे.