Gold Rate Hike : सोन्याचे भाव 5 लाखांवर जाणार? वेळीच खरेदी करा नाहीतर पश्चात्ताप!
Gold Rate Hike : सोन्याच्या दराने (Gold Rate) बुलेट ट्रेनसारखा वेग पकडला आहे. हे असंच चालू राहिलं, तर पुढच्या तीन वर्षांत सोन्याचा भाव पाच लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे वेळीच सोनं खरेदी करून ठेवणं फायद्याचं ठरेल.

वाढणारे सोन्याचे भाव
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सोन्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. लग्न, समारंभ किंवा कोणताही सण असो, महिला सोन्याच्या दागिन्यांनी सजतात. सोन्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं.
१९९० मध्ये दहा ग्रॅमचा भाव
सध्याच्या दरानुसार, १० ग्रॅम सोन्याचा भाव १,२०,००० रुपयांच्या पुढे गेला आहे. १९५० मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ९९ रुपये होती, तर १९९० मध्ये ती ३,२०० रुपये झाली होती.
गेल्या तीन वर्षांतील भाव
२०२३ मध्ये १० ग्रॅम सोन्याने ५०,००० रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तेव्हाच भाव किती वाढतील याची भीती लोकांना वाटत होती. पण त्यानंतर सोन्याचा भाव ७२,७७० रुपयांवर पोहोचला.
२०२८ पर्यंतचा अंदाजित भाव
सोन्याच्या दरातील वाढ अशीच कायम राहिल्यास, २०२८ च्या अखेरीस १० ग्रॅम सोन्याचा भाव ५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही आत्ताच थोडं सोनं खरेदी करून ठेवणं चांगलं, असे विश्लेषक सांगत आहेत. परंतु, यासाठी तज्ज्ञ व्यक्तीला सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल.
सोन्याचे भाव का वाढत आहेत?
सोन्याचे भाव वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. जसं की, वाढती महागाई, रुपयाचं अवमूल्यन, आर्थिक अनिश्चितता, वाढती मागणी आणि सेंट्रल बँकेकडून होणारी सोन्याची मोठी खरेदी. अनेक कारण असल्याने मागणी वाढत आहे.

