Gold - Silver Rate Today : सोने आणि चांदीचा भाव आज स्थिर आहे. या मौल्यवान धातूच्या किमतीत आज कोणतेही चढ-उतार झालेले नाहीत. जाणून घ्या किती आहे आजचा भाव?

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. मात्र आज सोन्यासह चांदीचे भावही स्थिर आहेत. आज २ ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

सोन्याचा आजचा दर किती?

काल शनिवारी १ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ४०० रुपयांनी वाढला होता. आज मात्र यात कोणाताही बदल झालेला नाही.

आज २ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,४४,२२० रुपये आहे. २२ कॅरेटचा दर १,३२,२०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी १,०८,२०० रुपये इतका आहे.

चांदीचा भाव काय?

आज २ ऑगस्ट रोजी सोन्यासह चांदीचा भावदेखील स्थिर आहे. चांदीच्या किमतीत कोणतेही बदल झालेले नाही. आज १ किलोग्रॅम चांदीचा भाव २,३५,००० रुपये इतका आहे.

सोने-चांदीचा दर सतत का बदलतोय?

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम होतो. रुपयाच्या तुलनेत वधारलेला डॉलर, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष, आयात शुल्क अशा अनेक गोष्टींचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने - चांदीच्या किमतीवर होतो. त्यानंतर तिथे बदललेल्या किमतीचा परिणाम भारतीय सराफा बाजारात होतोना दिसतो.

सोने दर कमी होणार का?

सोन्याचा दर कमी होईल अशी अनेकांना आशा आहे. मात्र सोन्याचा भाव आताच्या १ लाख ४० हजारांवरुन १ लाखांवर येणार नाही, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. सध्या सोन्याच्या दरात कमी झाली, तर दर केवळ १० ते २० टक्क्यांनी कमी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र सोनं एक ते सव्वा लाखांच्या घरात येईल, अशी कोणतीही शक्यता नसल्याचं एक्सपर्टकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदीसाठी त्याचा भाव कमी होण्याची वाट पाहत असाल, तर ते चुकीचं ठरेल. त्यापेक्षा आहे त्या दरात थोडी-थोडी सोन्याची खरेदी करणं फायद्याचं ठरेल.