Tungabhadra River : दावणगेरे जिल्ह्यातील होन्नाळी तालुक्यातील सास्वेहळ्ळीजवळ तुंगभद्रा नदीत मच्छिमारांच्या जाळ्यात ३२ किलो वजनाचा आणि दोन मीटर लांबीचा एक महाकाय हद्दू मासा सापडला आहे. 

Tungabhadra River : मच्छिमारांच्या जाळ्यात एक दुर्मिळ आणि महाकाय हद्दू जातीचा मासा सापडल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. कर्नाटक दावणगेरे जिल्ह्यातील होन्नाळी तालुक्यातील सास्वेहळ्ळी गावाजवळ तुंगभद्रा नदीत हा मासा सापडला. भद्रावती येथील मच्छिमार तुंगभद्रा नदीत नियमित मासेमारी करत असताना त्यांच्या गळ आणि जाळ्यात सुमारे ३२ किलो वजनाचा, दोन मीटर लांबीचा हद्दू मासा अडकला. सामान्यतः या आकाराचा हद्दू मासा दुर्मिळ असल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

माशाची विक्री, लोकांमध्ये उत्सुकता -

मच्छिमारांनी हा महाकाय मासा सास्वेहळ्ळी येथील यक्वाल नावाच्या स्थानिक मासळी व्यापाऱ्याला विकला. प्रतिकिलो ४०० रुपये दराने, एकूण १२,८०० रुपयांना या माशाची विक्री झाल्याचे समजते.

व्यापाऱ्याच्या दुकानासमोर लोकांची गर्दी - 

महाकाय हद्दू मासा पाहण्यासाठी मासळी व्यापाऱ्याच्या दुकानासमोर लोकांची मोठी गर्दी जमली होती. तुंगभद्रा नदीत एवढा मोठा मासा सापडल्याची बातमी वेगाने पसरल्याने स्थानिक आणि दूरवरूनही लोक मासा पाहण्यासाठी आले होते. काही जण माशासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते.

स्थानिकांमध्ये कुतूहल -

तुंगभद्रा नदीत अशा प्रकारचा महाकाय मासा सापडणे ही एक दुर्मिळ घटना आहे, ज्यामुळे मासेमारी आणि नदीच्या परिसंस्थेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. असे दुर्मिळ मासे अजूनही नदीत असू शकतात, अशी उत्सुकता स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.