- Home
- Utility News
- Women Cancer Risk : महिलांमधील कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टींकडे लक्ष द्या
Women Cancer Risk : महिलांमधील कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टींकडे लक्ष द्या
शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होण्याच्या स्थितीला कॅन्सर म्हणतात. गर्भाशयाचे मुख, अंडाशय, गर्भाशय आणि योनीसह महिलांच्या प्रजनन प्रणालीच्या कॅन्सरला गायनॅकॉलॉजिकल कॅन्सर म्हणतात.

महिलांमधील कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टींकडे लक्ष द्या
शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होण्याच्या स्थितीला कॅन्सर म्हणतात. गर्भाशयाचे मुख, अंडाशय, गर्भाशय आणि योनीसह महिलांच्या प्रजनन प्रणालीच्या कॅन्सरला गायनॅकॉलॉजिकल कॅन्सर म्हणतात. प्रत्येक गायनॅकॉलॉजिकल कॅन्सरची लक्षणे आणि धोक्याचे घटक वेगवेगळे असतात.
जीवनशैलीत करा हे बदल -
बहुतेक कॅन्सरप्रमाणे, गायनॅकॉलॉजिकल कॅन्सरचा धोका वयानुसार वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.
सर्वायकल, व्हजायनल कॅन्सर मुख्यत्वे HPV मुळे -
सर्वायकल, व्हजायनल आणि व्हल्व्हार कॅन्सर मुख्यत्वे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV) होतात. या कॅन्सरपासून संरक्षण देणाऱ्या HPV चाचणी आणि HPV लसीबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारा.
धूम्रपानाची सवय सोडल्यास कॅन्सरचा धोका कमी -
धूम्रपानामुळे सर्वायकल, अंडाशय, योनी आणि व्हल्व्हार कॅन्सरसह सुमारे १४ विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. इतकेच नाही, तर याचा शरीराच्या जवळपास सर्व अवयवांवर वाईट परिणाम होतो. तुम्ही खूप दिवसांपासून धूम्रपान करत असाल तरीही, ते सोडल्याने धोका कमी होऊ शकतो.
कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असल्यास धोका -
कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असल्यास काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कारण सर्व कॅन्सरपैकी ५ ते १० टक्के कॅन्सर आनुवंशिक असतात.
सर्वायकल कॅन्सर सुरुवातीलाच ओळखण्यासाठी पॅप टेस्ट -
सर्वायकल कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्यासाठी पॅप टेस्ट करा. २१ ते ६५ वयोगटातील प्रत्येक महिलेने नियमितपणे पॅप टेस्ट करणे आवश्यक आहे.
पौष्टिक आहार घेतल्यास कॅन्सरचा धोका कमी -
फळे, भाज्या, प्रथिने आणि धान्यांनी समृद्ध असलेला पौष्टिक आहार घेतल्यास गायनॅकॉलॉजिकल आणि इतर कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. अनारोग्यकारक किंवा अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळा.
रोज २० मिनिटे व्यायाम -
रोज २० मिनिटे व्यायामासाठी वेळ काढा. गर्भाशयाच्या मुखातून असामान्य रक्तस्त्राव, ओटीपोटात दाब किंवा वेदना, पोटदुखी, त्वचेच्या रंगात बदल यांसारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

