Bengali Makeup नवरात्रीच्या दुर्गा अष्टमी आणि नवमीसाठी पारंपरिक बंगाली मेकअप कसा करायचा, याबद्दलची ही माहिती आहे. यामध्ये परफेक्ट बेस, बोलके डोळे, लाल टिकली आणि लाल काठाच्या पांढऱ्या साडीसह संपूर्ण लूक कसा तयार करावा याच्या सोप्या टिप्स दिल्या आहेत. हा लूक पूजेसाठी एक सुंदर आणि शांत पर्याय आहे.

Navratri Makeup Tips: नवरात्रीचा सण, विशेषतः दुर्गा अष्टमी आणि नवमी, कन्या पूजनासाठी (लहान मुलींची पूजा) खूप खास मानला जातो. या दिवशी तुम्हाला काहीतरी वेगळं आणि खास दिसायचं असेल, तर पारंपरिक बंगाली मेकअप तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. बंगाली स्टाईल म्हणजे साधेपणा, नाजूकपणा आणि क्लास यांचा सुंदर मिलाफ. पूजेच्या मंगलमय वातावरणात हा लूक तुम्हाला खूप शांत आणि सुंदर दाखवतो. चला तर मग, जाणून घेऊया परफेक्ट बंगाली मेकअप लूक कसा करायचा.

सुरुवात करा एका परफेक्ट बेसने

बंगाली मेकअपमध्ये नॅचरल आणि चमकदार त्वचेला खूप महत्त्व आहे. यासाठी, आधी त्वचा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर, हलकं फाउंडेशन किंवा BB क्रीम वापरा, जेणेकरून तुमचा चेहरा 'पांढरट' किंवा खूप जास्त मेकअप केल्यासारखा दिसणार नाही. चेहऱ्यावरचे डाग लपवण्यासाठी कन्सीलरचा हलका थर लावा. यामुळे चेहऱ्याला एकसारखा आणि स्मूथ लूक मिळेल.

डोळ्यांचा बोल्ड मेकअप

बंगाली लूकचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बोलके आणि आकर्षक डोळे. यासाठी काजळ आणि आयलायनरचा भरपूर वापर करा. आयलायनर थोडं विंग्ड स्टाईलमध्ये लावा, म्हणजे तुमचे डोळे मोठे आणि अधिक आकर्षक दिसतील. तुम्ही हलका स्मोकी इफेक्ट देण्यासाठी ब्राऊन किंवा काळ्या रंगाचं आयशॅडो सुद्धा वापरू शकता.

पारंपरिक लाल टिकली आणि सिंदूर

लाल टिकलीशिवाय बंगाली लूक अपूर्णच आहे. तुमच्या कपाळाच्या मध्यभागी एक मोठी, गोल लाल टिकली लावा. जर तुम्ही विवाहित असाल, तर तुम्ही स्टायलिश पद्धतीने सिंदूर (कुंकू) लावून तुमचा लूक आणखी पारंपरिक बनवू शकता. ही खास स्टाईल पारंपरिक बंगाली दुर्गा पूजेच्या सौंदर्यातून प्रेरित आहे.

लाल लिपस्टिकने द्या परफेक्ट फिनिश

बंगाली मेकअपमध्ये लाल लिपस्टिकची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तुमच्या त्वचेच्या रंगाला शोभेल असा चमकदार लाल किंवा मरून रंग निवडा. मॅट-फिनिशवाली लिपस्टिक जास्त आकर्षक दिसते आणि जास्त वेळ टिकते.

ब्लश आणि हायलायटरने चेहऱ्यावर चमक आणा

तुमच्या गालांवर गुलाबी किंवा पीच रंगाचं ब्लश हलकंसं लावा. यामुळे चेहऱ्यावर एक नॅचरल आणि हेल्दी चमक येईल. त्यानंतर, चेहऱ्याचे उंच भाग (जसं की गालाची हाडं आणि नाकाचा शेंडा) हायलाईट करण्यासाठी थोड्या प्रमाणात हायलायटर लावा. यामुळे तुमच्या लूकमध्ये एक फ्रेश आणि चमकदारपणा येईल. 

हेअरस्टाईल आणि ॲक्सेसरीजकडे लक्ष द्या

अस्सल बंगाली लूक मिळवण्यासाठी, केसांचा अंबाडा (bun) घालून त्याला गजऱ्याने सजवा. हा लूक साडीवर खूपच सुंदर दिसतो. यासोबत सोन्याचे दागिने घाला, जसे की झुमके आणि चोकर नेकलेस. भांगात थोडंसं सिंदूर लावल्याने हा लूक आणखी खास दिसतो.

योग्य साडी निवडा

जर तुम्हाला एक परिपूर्ण बंगाली लूक हवा असेल, तर लाल काठाची पांढरी साडी निवडा. या साडीला 'लाल-पार साडी' म्हणून ओळखलं जातं. ही खास स्टाईल सहसा कन्या पूजन आणि दुर्गा पूजा यांसारख्या प्रसंगी आवर्जून नेसली जाते.

शेवटच्या काही टिप्स

मेकअप करताना, तुमचा संपूर्ण लूक खूप 'ओव्हरडन' दिसणार नाही याची काळजी घ्या. बंगाली मेकअपचं खरं सौंदर्य त्याच्या साधेपणात आणि पारंपरिक अंदाजात दडलेलं आहे. योग्य संतुलन साधून, तुम्हीही पूजेच्या वेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊ शकता.