MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Price Hike : सणासुदीच्या काळात ग्राहकांना शॉक! 1 ऑक्टोबरपासून टीव्ही, एसी महागणार

Price Hike : सणासुदीच्या काळात ग्राहकांना शॉक! 1 ऑक्टोबरपासून टीव्ही, एसी महागणार

दसरा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. १ ऑक्टोबरपासून एसी, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रिजच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. पण या दरवाढीमागचं नेमकं कारण काय आहे?

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 28 2026, 04:35 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
टीव्ही आणि वॉशिंग मशीनच्या किमती वाढणार
Image Credit : Gemini AI

टीव्ही आणि वॉशिंग मशीनच्या किमती वाढणार

दसरा आणि दिवाळी सण जवळ आले की आपण सगळेच घरात नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गृहपयोगी उपकरणे आणण्याची तयारी करतो. कंपन्यांच्या डिस्काउंट आणि बंपर ऑफर्सची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. पण यावेळी ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. १ ऑक्टोबरपासून एसी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रिजच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढवणार असल्याचे प्रमुख उत्पादक कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
सलग तिसऱ्यांदा दरवाढ.. कारणे काय?
Image Credit : Gemini AI

सलग तिसऱ्यांदा दरवाढ.. कारणे काय?

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात २०२६ या वर्षातील ही सलग तिसरी दरवाढ आहे. गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन खर्च वाढत असला तरी कंपन्या स्वतः तो भार उचलत होत्या. पण आता नफ्याचे प्रमाण कमी होत असल्याने नाईलाजाने हा भार ग्राहकांवर टाकला जात आहे. मार्केटमधील सूत्रांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात तांबे, स्टील, ॲल्युमिनियम आणि क्रूड ऑइलवर आधारित प्लास्टिकच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याशिवाय पश्चिम आशियातील राजकीय संकट, वाढता वाहतूक खर्च आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार यामुळे कंपन्यांचा खर्च वाढला आहे.

Related Articles

Related image1
Online Shopping Rules : ऑनलाईन शॉपिंगचे नवे नियम.. या 7 गोष्टी नक्की करा
Related image2
Passenger Vehicle Sales : कार महागल्या तरीही सप्टेंबरमध्ये विक्री 15-16 टक्क्यांनी वाढणार
36
कोणत्या वस्तूवर किती दरवाढ?
Image Credit : Asianet News

कोणत्या वस्तूवर किती दरवाढ?

एसी बनवण्यासाठी तांबे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वी तांब्याची किंमत ८,००० ते ९,००० डॉलर प्रति मेट्रिक टन होती, ती आता थेट १४,५०० डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे एसीच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढतील. तर वॉशिंग मशीन, फ्रिज आणि एलईडी टीव्हीच्या किमती २ ते ४ टक्क्यांनी वाढतील. ब्लू स्टार, गोदरेज, हायर, डायकिन, सुपर प्लास्ट्रोनिक्स आणि व्होल्टास यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी दरवाढीला दुजोरा दिला आहे. एलजी, बॉश आणि पॅनासोनिक या कंपन्याही एसीच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या विचारात आहेत.

46
जुन्या स्टॉकवर ऑफर्स
Image Credit : AI Generated

जुन्या स्टॉकवर ऑफर्स

या दरवाढीच्या संकटात ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमीही आहे. कंपन्यांनी नवीन किमती जाहीर केल्या असल्या तरी, डीलर्स आणि वितरकांकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात खरेदी केलेला जुना स्टॉक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

साधारण महिना ते दीड महिना पुरेल एवढा जुना स्टॉक असल्याने, दिवाळी संपेपर्यंत ग्राहकांना जुन्याच किमतीत वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. दिवाळी संपल्यानंतरच बाजारात नवीन किमती पूर्णपणे लागू होतील, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

56
२०३० पर्यंत ३.२५ लाख कोटींची बाजारपेठ
Image Credit : facebook/TataConsumerProducts

२०३० पर्यंत ३.२५ लाख कोटींची बाजारपेठ

एकीकडे किमती वाढत असल्या तरी, भारतीय कन्झ्युमर ड्युरेबल्स मार्केटचे भविष्य खूप आशादायी असल्याचे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) आणि सीआयआय (CII) च्या अहवालात म्हटले आहे. २०३० पर्यंत ही बाजारपेठ ३ ते ३.२५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. येत्या पाच वर्षांत भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठांपैकी एक बनेल.

थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्ही एसी, टीव्ही किंवा वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल, तर डीलर्सकडे जुना स्टॉक असतानाच खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

66
वाहनांच्या किमतीही वाढणार
Image Credit : Asianet News

वाहनांच्या किमतीही वाढणार

केवळ गृहपयोगी वस्तूच नाही, तर ऑटोमोबाईल क्षेत्रातही दरवाढीची झळ बसत आहे. धातूंच्या किमती वाढल्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आपल्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांच्या (SUV) किमती वाढवण्याच्या विचारात आहे. तसेच, टाटा मोटर्सही टप्प्याटप्प्याने गाड्यांच्या किमती वाढवणार असल्याचे टीएमपीव्हीने (TMPV) सांगितले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मारुती सुझुकीच्या गाड्याही महागणार आहेत. येत्या दोन आठवड्यांत यावर अधिक स्पष्टता येईल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
EV Cars Under 15 Lakh : 15 लाखांच्या आत मिळणाऱ्या 5 बेस्ट इलेक्ट्रिक कार्स; रेंज आणि किंमत पाहा
Recommended image2
Notional Increment : 'नोशनल इंक्रीमेंट' म्हणजे काय? पगार न वाढताही इंक्रीमेंट मिळतं का?
Recommended image3
iPhone 18 Pro : आयफोन 18 प्रो किंमतीत मोठी कपात; 57,000 रुपयांची ऑफर कशी मिळवायची?
Recommended image4
TRAI Recharge Plans : नो डेटा... ओन्ली कॉल्स! ट्राय आणतंय नवे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स
Recommended image5
Aadhaar Card KYC : आधार कार्डधारकांसाठी गुड न्यूज, आता टेन्शन घेण्याची गरज नाही! वाचा नक्की काय आहे अपडेट
Related Stories
Recommended image1
Online Shopping Rules : ऑनलाईन शॉपिंगचे नवे नियम.. या 7 गोष्टी नक्की करा
Recommended image2
Passenger Vehicle Sales : कार महागल्या तरीही सप्टेंबरमध्ये विक्री 15-16 टक्क्यांनी वाढणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved