आयफोन युजर्सला माहित नाहीत हे फीचर्स, जाणून घ्या माहिती
आयफोनमध्ये अनेक उपयुक्त पण दुर्लक्षित फीचर्स आहेत, जसे की बॅक टॅप. या फीचरद्वारे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, तसेच अनोळखी कॉल्सना आपोआप फिल्टर करू शकता. याशिवाय, एअरपॉड्सचा वापर करून दुरून ग्रुप फोटो कसा काढायचा याचीही माहिती दिली आहे.

आयफोन युजर्सला माहित नाहीत हे फीचर्स, जाणून घ्या माहिती
आयफोनचा वापर करताना त्यामध्ये आपण विविध स्पेसिफिकेशन जास्त देण्यात आले आहेत. यामध्ये नेमके कोण कोणते स्पेसिफिकेशन आहेत ते जाणून घ्या.
आयफोन का प्रसिद्ध?
आपण आयफोनच्या युझर असाल तर त्यामध्ये कोणते स्पेसिफिकेशन देण्यात आलेले असतात त्याबद्दलची माहिती आपल्याला असायला हवी. हा फोन खासकरून कॅमेरा आणि स्पेसिफिकेशनसाठी प्रसिद्ध आहे.
बॅक टॅप फीचर्सबद्दल घ्या जाणून
बॅक टॅप (Back Tap) हे आयफोनमधील सर्वात भारी पण दुर्लक्षित फीचर आहे. फोनच्या मागच्या बाजूला फक्त बोटाने टॅप करून तुम्ही अनेक कामे करू शकता. फोनच्या मागील भागावर दोनदा (Double Tap) किंवा तीनदा (Triple Tap) टॅप केल्यावर ठराविक टास्क पूर्ण होतो.
याचा वापर कसा करता येईल?
स्क्रिनशॉट काढणे, फ्लॅशलाईट लावणे आणि कॅमेरा उघडणे किंवा सायलेंट मोड करणे यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. आपण सेटिंगमध्ये जाऊन ते बदल करून घेऊ शकता.
अनोळखी नंबरवरून येणारे कॉल करा बंद
अनोळखी नंबरवरून येणारे फालतू कॉल्स आणि मेसेजेस जर तुम्हाला त्रास होत असेल तर iOS 26 मधील स्मार्ट फिल्टर हे काम सोपे करते. संशयास्पद कॉल्स आपोआप फिल्टर होतात.
ग्रुप फोटो कसा काढावा?
तुमचे एअरपॉड्स आता रिमोट कंट्रोलसारखे काम करतील. एअरपॉडच्या 'स्टेम'वर (बटणावर) दाबून तुम्ही दुरूनच फोटो क्लिक करू शकता.

