MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Loan App Scam : 5 मिनिटांत कर्ज? हव्यासापोटी ॲप इन्स्टॉल कराल तर आयुष्य उद्ध्वस्त होईल

Loan App Scam : 5 मिनिटांत कर्ज? हव्यासापोटी ॲप इन्स्टॉल कराल तर आयुष्य उद्ध्वस्त होईल

पैशांची तातडीची गरज ओळखून अवघ्या काही मिनिटांत कर्ज देण्याचं आमिष दाखवणारे फेक लोन ॲप्स सध्या धुमाकूळ घालत आहेत. या खोट्या ॲप्सच्या जाळ्यात अडकून लोकांची मोठी फसवणूक होत आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 03 2026, 04:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
लोन ॲपद्वारे फसवणूक
Image Credit : Gemini

लोन ॲपद्वारे फसवणूक

पैशांची तातडीची गरज असते, तेव्हा लोन ॲप्सवरून कर्ज घेणं खूप सोपं वाटतं. काही क्लिक्स, थोडी वैयक्तिक माहिती आणि लगेच पैसे मिळण्याचं आमिष लोकांना विचार न करता पुढची स्टेप घ्यायला भाग पाडतं. पण खरी अडचण इथेच सुरू होते. खऱ्या फायनान्स कंपन्यांसारखेच दिसणारे हे फेक ॲप्स तात्काळ मंजुरी, कमी व्याज आणि सोप्या कागदपत्रांचं गाजर दाखवून लोकांना फसवतात. यात फक्त तुमचे पैसेच जात नाहीत, तर तुम्ही शेअर केलेली महत्त्वाची माहिती तुमच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका बनू शकते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
धोक्याचे संकेत
Image Credit : Gemini

धोक्याचे संकेत

मणिपाल फिनटेकच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. ते सांगतात की, कर्ज देणाऱ्या कंपनीबद्दल अस्पष्टता, व्याजदर आणि अतिरिक्त शुल्काची लपवाछपवी, विनाकारण मागितलेल्या परवानग्या आणि कोणतीही आर्थिक पडताळणी न करता कर्ज देण्याची आश्वासने हे फेक ॲप्सचे मुख्य संकेत आहेत. त्यामुळे केवळ आकर्षक डिझाईन, तात्काळ मंजुरी किंवा कमी व्याजदर पाहून कोणत्याही ॲपवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी ॲपच्या मागील कंपनीची खात्री नक्की करा.

Related Articles

Related image1
Gold Loan : गोल्ड लोन घेताय? ५ गोष्टी माहिती हव्याच, या चुका अजिबात करू नका
Related image2
Car Loan : गाडीसाठी कार लोन की पर्सनल लोन योग्य? तुमच्यासाठी काय जास्त फायद्याचं?
35
पडताळणी कशी करावी?
Image Credit : Gemini

पडताळणी कशी करावी?

एखादं ॲप ॲप स्टोअरवर आहे, म्हणजे ते सुरक्षित आहे असं नाही. ते डाऊनलोड करण्यापूर्वी डेव्हलपरचं नाव, माहिती, प्रायव्हसी पॉलिसी, कस्टमर केअर डिटेल्स आणि लेटेस्ट रिव्ह्यू नक्की तपासा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही माहिती कर्ज देणाऱ्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटशी जुळली पाहिजे. याशिवाय, कर्ज देणारी बँक किंवा NBFC (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी) भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) मान्यताप्राप्त आहे का, हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. RBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या डिजिटल लेंडिंग ॲप्सची यादी तपासू शकता.

45
विनाकारण परवानग्यांचा धोका!
Image Credit : Gemini

विनाकारण परवानग्यांचा धोका!

कर्ज देण्याशी काहीही संबंध नसलेल्या परवानग्या जेव्हा एखादं ॲप मागतं, तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवं. तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स, कॉल लॉग्स किंवा फोटो आणि फाईल्स ॲक्सेस करण्याची परवानगी मागणं हा खूप मोठा धोका आहे. केवायसी (KYC) साठी कॅमेरासारखे फीचर्स आवश्यक असू शकतात, पण इतर परवानग्या का आणि कोणत्या टप्प्यावर मागितल्या जात आहेत, हे युजर्सनी समजून घेतलं पाहिजे. गरज आणि स्पष्टता असेल तरच ॲप्सना परवानगी द्या.

55
कर्जाचा एकूण खर्च
Image Credit : Gemini

कर्जाचा एकूण खर्च

जाहिरातीत दाखवलेला कमी व्याजदर म्हणजे कर्जाचा संपूर्ण खर्च नसतो. कर्ज घेण्यापूर्वी वार्षिक टक्केवारी दर (APR), प्रोसेसिंग फी, इतर छुपे शुल्क आणि एकूण परतफेड करावी लागणारी रक्कम याचं गणित नक्की करा. आधार, पॅन आणि बँक खात्याची माहिती देण्यापूर्वी ती अधिकृत प्लॅटफॉर्मवरच मागितली जात आहे ना, याची खात्री करा. व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर आलेल्या लिंकवरून अनोळखी ॲप्स डाऊनलोड करणारे, किंवा कागदपत्रांविना कर्ज मिळवण्याच्या नादात कॉलेजचे विद्यार्थी अनेकदा याला बळी पडतात. त्यामुळे 'पैसे किती लवकर मिळतील?' यापेक्षा 'कर्ज कोण देतंय?' हा प्रश्न आधी स्वतःला विचारा.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Flipkart Big Billion Days : फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंगच्या फोन्सवर बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर्स
Recommended image2
AI Revolution: भारताची पुढची मोठी क्रांती! योग्य चिप्सच यशाचं रहस्य - राजीव चंद्रशेखर
Recommended image3
Eye Glass Care: चष्मा पुसताना या ५ चुका टाळा, नाहीतर लेन्स खराब होईल आणि नंबर वाढेल
Recommended image4
Wireless Doorbell : वायरिंगची झंझट नाही, लाईटचं टेन्शन नाही.. फक्त 499 रुपयांत वायरलेस डोअरबेल
Recommended image5
Bluetooth Speaker : सणासुदीच्या ऑफरमध्ये ब्लूटूथ स्पीकर घेताय? मग या ७ गोष्टी नक्की तपासा
Related Stories
Recommended image1
Gold Loan : गोल्ड लोन घेताय? ५ गोष्टी माहिती हव्याच, या चुका अजिबात करू नका
Recommended image2
Car Loan : गाडीसाठी कार लोन की पर्सनल लोन योग्य? तुमच्यासाठी काय जास्त फायद्याचं?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved