EPFO च्या सेवांमध्ये झालेत अमुलाग्र बदल, एका क्लिकवर जाणून घ्या हे बदल
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल सेवांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन सुधारणांमुळे पीएफ बॅलन्स तपासणे, पैसे काढणे आणि पेन्शन देणे खूप सोपे झाले आहे.

गेल्या काही महिन्यांत EPFO मध्ये अनेक बदल झाले आहेत. आता EPFO मधून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल सेवांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत.
नवीन सुधारणांमुळे पीएफ बॅलन्स तपासणे, पैसे काढणे आणि पेन्शन देणे खूप सोपे झाले आहे. २०२५ साली कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या EPFO संबंधित कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
आता एका क्लिकवरच EPFO संबंधित सर्व माहिती मिळेल, नवीन नियम लागू.
आता नोंदणीकृत मोबाईलवरून EPFO संबंधित सर्व माहिती मिळेल. तसेच, 10 भाषांमध्ये माहिती उपलब्ध असेल.
पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी किंवा पेन्शन संबंधित माहिती मिळविण्यासाठी एक मिस कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.
७७३८२९९८९९ किंवा ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर आता मिस कॉल द्या किंवा एसएमएस करा.
ताबडतोब पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी किंवा पेन्शन संबंधित माहिती मिळविण्यासाठी. तसेच जर तुम्हाला काही माहिती बदलवायची असेल तर तेही फोनवरून करता येईल.
तसेच आता खाते हस्तांतरणही सोपे झाले आहे. 15 जानेवारीपासून नियोक्त्याच्या परवानगीशिवाय हे काम करता येत आहे.

