- Home
- Utility News
- तुम्ही दररोज दूध पिता? दूध प्यायल्याने हृदयविकाराचा वाढतो धोका, जाणून घ्या कोणत्या प्रकारचे दूध प्यायला हवे!
तुम्ही दररोज दूध पिता? दूध प्यायल्याने हृदयविकाराचा वाढतो धोका, जाणून घ्या कोणत्या प्रकारचे दूध प्यायला हवे!
Does Drinking Milk Increase Heart Attack Risk : दूध प्यायल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो हे खरं असलं तरी, ते तुम्ही कोणत्या प्रकारचं आणि किती दूध पिता यावर अवलंबून असतं.

कोणते दूध कमी हानिकारक?
दूध प्यायल्याने हृदयरोग होण्याचा धोका वाढतो का? यावर खूप चर्चा सुरू आहे. पण एका नवीन अभ्यासानुसार, फुल फॅट दूध पिणे कमी हानिकारक असल्याचे दिसून आले आहे.
फुल फॅट दूध आणि आरोग्य
CARDIA अभ्यासानुसार, कमी फॅट दूध पिणाऱ्यांमध्ये कॅल्शियमचे साठे आढळले. तर फुल फॅट दूध पिणाऱ्यांमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका दुधाच्या प्रकारावर अवलंबून असतो.
रोज फुल फॅट दूध पिणे योग्य आहे का?
रोजच्या आहारात फुल फॅट दुधाचा समावेश करणे चांगला पर्याय नाही. जास्त फुल फॅट दूध प्यायल्यास कोलेस्ट्रॉलचा त्रास होऊ शकतो. पण हृदयविकाराचा धोका तुमच्या जीवनशैलीवरही अवलंबून असतो.
हृदयविकाराची कारणे
धूम्रपान.
उच्च रक्तदाब.
उच्च कोलेस्ट्रॉल.
मधुमेह.
लठ्ठपणा.
बैठी जीवनशैली.
अयोग्य आहार.
हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे
छातीत दुखणे.
खांदे किंवा बाहूंमध्ये वेदना.
थंड घाम येणे.
चक्कर येणे आणि अशक्तपणा.
मळमळ आणि उलट्या.
अस्वस्थ वाटणे.
श्वास घेण्यास त्रास होणे.
हृदयविकार टाळण्यासाठी टिप्स
दारू आणि सिगारेट सोडा.
चांगला आहार घ्या.
नियमित व्यायाम करा.
वजन कमी करा.
तणाव कमी करा.
पुरेशी झोप घ्या.

