दारूसोबत या 'साइड डिश' खाऊ नका! दारूपेक्षाही वाईट परिणाम होतील
दारू पिताना काही पदार्थ खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दारुसोबत कोणते पदार्थ सेवन करू नयेत. याची माहिती घेऊ या…

दारू पिताना हे टाळा
सहसा, दारू पिणारे लोक दारूसोबत काही पदार्थ खातात. असे काही पदार्थ खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दारू पिताना कोणते पदार्थ खावेत याबाबत नेहमी काळजी घेतली पाहिजे. विशेषतः रात्रीच्या वेळी दारूसोबत खाणाऱ्या पदार्थांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, दारू पिताना कोणते पदार्थ खाऊ नयेत, हे आपण या लेखात पाहूया.
छातीत जळजळ होऊ शकते
दारू पिताना काही लोकांना तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खायला आवडतात. पण असे तेलकट पदार्थ दारूसोबत खाल्ल्यास छातीत जळजळ आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय लठ्ठपणाही वाढतो.
कोणते पदार्थ खाऊ नयेत?
त्याचप्रमाणे, दारू पिताना मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. विशेषतः, मसालेदार चिकन आणि मटण खाणे टाळावे. ऑम्लेटसारखे पदार्थही दारूसोबत खाऊ नयेत.
पोटाच्याही होतील समस्या
याशिवाय, दारू पिताना ब्रेडशी संबंधित पदार्थ खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, चॉकलेटसारखे गोड पदार्थ आणि बर्गर, पिझ्झा यांसारख्या गोष्टीही दारू पिताना खाऊ नयेत. हे पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या तर होतातच, पण गॅस, पोटात जळजळ आणि पोट फुगणे यांसारख्या समस्याही निर्माण होतात.
काय खाणे असेल आरोग्यदायी
दारू प्यायल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, गरम सॉस यांसारखे पदार्थ खाल्ल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्याऐवजी भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.

