सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर भरती सुरू आहे. यासाठी कोण अप्लाय करू शकतं? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Job Vacancy: सणासुदीचे दिवस सुरू होण्यापूर्वीच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक भारी बातमी आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या 'डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन'मध्ये सध्या बंपर भरती सुरू आहे. या संस्थेने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून, 'बिझनेस अॅनालिस्ट' या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
कोण करू शकतं अप्लाय?
या आयटी कंपनीने दिलेल्या जाहिरातीनुसार, ही भरती बिझनेस अॅनालिस्ट पदासाठी होणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. पण, जर तुमचं शिक्षण कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) मध्ये झालं असेल (पदवी किंवा पदव्युत्तर), तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. यासोबतच, संबंधित क्षेत्रात ८ वर्षांचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. इतर अटी आणि शर्तींसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
अर्ज कसा करायचा?
या पदासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला डिजिटल इंडियाच्या https://dic.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईटच्या होमपेजवर 'करिअर' (Career) ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला ही जाहिरात दिसेल. तिथे विचारलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन नक्की वाचा.
दुसरीकडे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (RRB) 'एनटीपीसी अंडरग्रॅज्युएट रिक्रुटमेंट २०२६' साठी एक शॉर्ट नोटीस काढली आहे. या भरती प्रक्रियेतून विविध झोनमध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीतील पदवी स्तरावरील १,६८८ पदे भरली जाणार आहेत. यासाठी १५ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि उमेदवार १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत फॉर्म भरू शकतील. ही भरती CEN 07/206 अंतर्गत राबवली जात आहे. रेल्वेकडून १४ ऑक्टोबरला याबद्दलची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
या पदांसाठी होणार भरती
RRB NTPC UG भरती प्रक्रियेत चार वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. यामध्ये ट्रेन्स क्लर्कसाठी १८८ पदे, कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी ७०० पदे, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टसाठी २०० पदे आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी ६०० पदे आहेत. अशी एकूण १,६८८ पदे भरली जातील. कमर्शियल कम तिकीट क्लर्क पदासाठी सुरुवातीचा पगार २१,७०० रुपये असेल. तर ट्रेन्स क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी सुरुवातीचा पगार १९,९०० रुपये असणार आहे. या सर्व पदांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार आणि इतर भत्ते दिले जातील.


