Digestion Tips: पचनक्रिया सुधारायचीये? मग आहारात 'या' गोष्टींचा समावेश कराच!
Digestion Tips: आपली पचनसंस्था आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. अन्नाचं पचन करणं, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं आणि पोषक तत्वं शोषून घेणं, ही तिची मुख्य कामं आहेत. पचनक्रिया चांगली राहावी यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं फायद्याचं ठरतं.
15

Image Credit : Getty
लिंबू पाणी
लिंबामध्ये भरपूर पोषक तत्वं असतात. रोज लिंबू पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
25
Image Credit : Getty
पुदिना
पुदिन्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. आहारात पुदिन्याचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते आणि मळमळ थांबण्यास मदत होते.
35
Image Credit : Getty
आलं
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि मळमळ, उलट्या रोखण्यासाठी आलं खाणं चांगलं असतं. तुम्ही आल्याचा चहा किंवा आलं घातलेलं गरम पाणी पिऊ शकता.
45
Image Credit : Instagram
दही
दह्यामध्ये आरोग्यासाठी चांगले बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
55
Image Credit : Getty
बडीशेप
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय, रक्तदाब कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठीही बडीशेप फायदेशीर आहे.

