MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • क्रेडिट कार्डसाठी Annual Fee भरायची गरज नाही? अशा प्रकारे मिळवू शकता Lifetime Free Card

क्रेडिट कार्डसाठी Annual Fee भरायची गरज नाही? अशा प्रकारे मिळवू शकता Lifetime Free Card

क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्क टाळण्यासाठी काही ग्राहकांना बँकेकडून फी माफी किंवा लाइफटाइम फ्री कार्डची ऑफर मिळू शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 10 2026, 01:31 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्क
Image Credit : Getty

क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्क

क्रेडिट कार्डवर दरवर्षी आकारले जाणारे वार्षिक शुल्क टाळण्याची इच्छा अनेकांची असते. काही वेळा बँका ग्राहकांना त्यांचे रेग्युलर किंवा पेड क्रेडिट कार्ड ‘लाइफटाइम फ्री’ करण्याची ऑफर देतात. मात्र, बँका असा निर्णय का घेतात आणि ग्राहक आपले कार्ड लाइफटाइम फ्री कसे करून घेऊ शकतात? जाणून घ्या याबाबतची महत्त्वाची माहिती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
Image Credit : Gemini AI

लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड म्हणजे असे कार्ड, ज्यासाठी ग्राहकाकडून जॉइनिंग फी किंवा वार्षिक रिन्युअल फी आकारली जात नाही. मात्र, ‘फ्री’ म्हणजे कार्डशी संबंधित प्रत्येक शुल्क माफ होते, असा त्याचा अर्थ नाही.क्रेडिट कार्डचे बिल वेळेत न भरल्यास व्याज, लेट पेमेंट चार्ज आणि एटीएममधून रोख रक्कम काढल्यास संबंधित शुल्क लागू होऊ शकते. त्यामुळे लाइफटाइम फ्री कार्ड असले तरी कार्डच्या इतर नियम आणि शुल्कांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

Related image1
Credit Score: तुमचा CIBIL स्कोअर खराब झालाय? तो पुन्हा सुधारायला किती वेळ लागतो?
Related image2
iPhone 18 Pro येतोय! iPhone 15 Pro च्या तुलनेत काय असेल खास?
36
बँका कार्ड लाइफटाइम फ्री का करतात?
Image Credit : Getty

बँका कार्ड लाइफटाइम फ्री का करतात?

बँका केवळ ग्राहकांवर उपकार म्हणून क्रेडिट कार्डची वार्षिक फी माफ करत नाहीत. त्यामागे ग्राहक टिकवून ठेवण्याचे व्यावसायिक कारण असते. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी बँकेला मार्केटिंग आणि इतर खर्च करावा लागतो. त्याऐवजी आधीपासून असलेला आणि नियमित व्यवहार करणारा ग्राहक टिकवणे बँकेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.क्रेडिट कार्डच्या वार्षिक शुल्काव्यतिरिक्त बँकांना कार्डवरील व्यवहार, ईएमआय आणि इतर सेवांमधूनही उत्पन्न मिळते. त्यामुळे नियमितपणे कार्डचा वापर करणाऱ्या आणि वेळेवर बिल भरणाऱ्या ग्राहकाला टिकवून ठेवण्यासाठी बँक शुल्क माफ करण्याची ऑफर देऊ शकते.

46
कार्ड लाइफटाइम फ्री करण्याची सर्वात सोपी पद्धत
Image Credit : Getty

कार्ड लाइफटाइम फ्री करण्याची सर्वात सोपी पद्धत

जर तुमचा क्रेडिट कार्डचा वापर नियमित असेल आणि तुम्ही वेळेवर बिल भरत असाल, तर कार्डची वार्षिक फी माफ करून घेण्यासाठी कार्ड बंद करण्यासाठी रिक्वेस्ट टाकू शकता. ग्राहकाने कार्ड बंद करण्याची किंवा क्लोजरची विनंती केल्यानंतर अनेकदा बँकेचे रिटेन्शन डिपार्टमेंट ग्राहकांशी संपर्क साधते. ग्राहकाला गमावण्याऐवजी बँक काही वेळा कार्ड बंद न करण्याच्या बदल्यात वार्षिक शुल्क माफ करण्याची किंवा पेड कार्ड लाइफटाइम फ्री करण्याची ऑफर देऊ शकते. मात्र, अशी ऑफर प्रत्येक ग्राहकाला किंवा प्रत्येक कार्डसाठी मिळेलच असे नाही. ती बँकेच्या धोरणावर, ग्राहकाच्या व्यवहारांवर आणि इतर अटी आणि नियमांवर अवलंबून असते.

56
दरवर्षी ठरावीक खर्च केल्यासही शुल्क माफ होऊ शकते
Image Credit : Asianet News

दरवर्षी ठरावीक खर्च केल्यासही शुल्क माफ होऊ शकते

काही क्रेडिट कार्डवर वर्षभरात ठरावीक रकमेचा खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ केले जाते. त्यामुळे आपल्या कार्डच्या अटी आणि नियमांमध्ये अशी सुविधा आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही बँकेने ठरवून दिलेली वार्षिक खर्चाची मर्यादा सातत्याने पूर्ण करत असल्यास काही कार्ड्समध्ये वार्षिक शुल्क माफ होऊ शकते. त्यामुळे कार्ड बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्डच्या फी वेव्हरच्या अटी तपासणे फायदेशीर ठरते.

66
कार्ड बंद करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
Image Credit : Asianet News

कार्ड बंद करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

  • फक्त वार्षिक शुल्क वाचवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करण्याची घाई करू नका. कार्ड बंद करण्यापूर्वी बँकेकडे लाइफटाइम फ्री किंवा फी वेव्हरची ऑफर उपलब्ध आहे का, याची चौकशी करा.
  • कार्ड बंद केल्यास तुमच्या एकूण क्रेडिट लिमिटवर आणि क्रेडिट हिस्ट्रीवर होणारा परिणामही लक्षात घेणे आवश्यक आहे.
  • बँकेकडून मिळणारी कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी तिच्या अटी स्पष्टपणे समजून घ्या.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
iPhone 18 Pro येतोय! iPhone 15 Pro च्या तुलनेत काय असेल खास?
Recommended image2
फ्लोरल सिल्व्हर डिझाईनचे आकर्षक पर्याय, पाहून पडाल प्रेमात
Recommended image3
मराठी मंगळसूत्राच्या आकर्षक डिझाइन्स, पाहूनच व्हाल वेडे
Recommended image4
१५ ऑगस्टला बाळी करा खरेदी, लूक पाहून व्हाल थक्क
Recommended image5
कानातले खास डिझाइन्स, पाहूनच पडाल प्रेमात
Related Stories
Recommended image1
Credit Score: तुमचा CIBIL स्कोअर खराब झालाय? तो पुन्हा सुधारायला किती वेळ लागतो?
Recommended image2
iPhone 18 Pro येतोय! iPhone 15 Pro च्या तुलनेत काय असेल खास?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved