वाढदिवसाच्या पार्टीनंतर उरलेले प्लास्टिकचे चमचे फेकून देऊ नका! या चमच्यांपासून फुलं, आरशाची सजावट, कॅन्डल होल्डर आणि मोर कसा बनवायचा हे जाणून घ्या. या DIY आयडिया वापरून तुम्ही घराला एक स्टायलिश आणि मॉडर्न लुक देऊ शकता.

Plastic Spoon Craft: आपल्या घरी वाढदिवस किंवा कोणताही कार्यक्रम असला की आपण प्लास्टिकचे चमचे आणि ग्लास आणतो. कार्यक्रम झाल्यावर उरलेले चमचे इकडे-तिकडे पडून राहतात आणि शेवटी आपण ते फेकून देतो. पण थांबा! याच प्लास्टिकच्या चमच्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरासाठी सुंदर आणि मॉडर्न शो-पीस बनवू शकता. चला, आम्ही तुम्हाला काही क्रिएटिव्ह आयडिया दाखवतो की तुम्ही या प्लास्टिकच्या चमच्यांचा वापर कसा करू शकता.

प्लास्टिकच्या चमच्यांपासून बनवा क्रिएटिव्ह फुलं

प्लास्टिकच्या चमच्यांनी तुम्ही खूप सुंदर फुलं बनवू शकता. यासाठी चमच्यांच्या दांड्या कापून घ्या. एका मेणबत्तीच्या मदतीने चमच्यांना थोडंसं वाकवून फुलाच्या पाकळीचा आकार द्या. ते सेट झाल्यावर त्यावर रंगीबेरंगी कलर करा. असे पाच चमचे एकत्र जोडून एक फूल तयार करा आणि मध्यभागी काही मोती लावून त्याला अजून आकर्षक बनवा.

आणखी वाचा- जुने प्लास्टिकचे चमचे फेकू नका, पुन्हा वापरून बनवा क्रिएटिव्ह DIY

आरशाच्या सजावटीसाठी करा वापर

प्लास्टिकच्या चमच्यांचा वापर तुम्ही आरशाच्या सजावटीसाठीही करू शकता. तुमच्याकडे लहान गोल आरसा असेल, तर त्याच्या कडेने गोलाकार पद्धतीने चमचे चिकटवत जा. साधारण ५-६ लेअर्स तयार झाल्यावर त्यावर शेडेड कलर किंवा सोनेरी/चांदेरी रंग द्या.

फ्लॉवर पॉट म्हणून करा वापर

प्लास्टिकच्या चमच्यांचा वापर तुम्ही फ्लॉवर पॉटसाठीही करू शकता. सगळ्यात आधी एका बाटलीचा वरचा भाग कापून त्याचा बेस तयार करा. त्यावर चमच्यांच्या दांड्या कापून ते चिकटवत जा. आता संपूर्ण पॉटवर सोनेरी रंग द्या. काही मोती लावून सजावट करा. यात तुम्ही खरी किंवा कृत्रिम फुलं ठेवून घराबाहेर सजवू शकता.

कॅन्डल होल्डर म्हणून करा वापर

प्लास्टिकच्या चमच्यांचा वापर तुम्ही कॅन्डल होल्डर म्हणूनही करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यात खरी मेणबत्ती किंवा दिवा लावू नका. फक्त बॅटरीवर चालणारे दिवे किंवा कॅन्डल वापरा. चमच्यांच्या दांड्या कापून फुलासारखा आकार तयार करा. त्याचे डबल लेअर बनवा आणि मध्यभागी कॅन्डल किंवा दिवा ठेवा.

क्रिएटिव्ह मोर बनवा

प्लास्टिकच्या चमच्यांपासून तुम्ही एक सुंदर मोरही बनवू शकता आणि तो घरातील कोणत्याही भिंतीवर लावू शकता. आधी मोराचा चेहरा तयार करा. त्याचा पिसारा बनवण्यासाठी प्लास्टिकच्या चमच्यांचा वापर करा. तुम्ही याला सोनेरी रंग देऊ शकता किंवा चमचे पांढरेच ठेवून त्यावर निळ्या रंगाचे खडे चिकटवू शकता.