मुलांना वारंवार येणारा खोकला, धाप लागणे किंवा नाक चोंदण्याचा त्रास हा अनेकदा धुळीच्या ॲलर्जीमुळे होतो, असा समज असतो. पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या लक्षणांमागे खरे कारण घरातील झुरळे असू शकतात.  त्यामुळे वेळेवर योग्य उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.

घर स्वच्छ दिसतंय, तरी मुलांचा खोकला थांबत नाही? मग,ही समस्या धुळीची नसून झुरळांची असू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, झुरळांची लाळ, त्वचेचे सूक्ष्म कण आणि विष्ठा मुलांमध्ये ॲलर्जी, धाप लागणे आणि श्वसनाचे त्रास निर्माण करू शकतात. 

धुळीची ॲलर्जी अधिक गंभीर असू शकते. पण खरा त्रास धुळीचा नसून झुरळांचा असतो. तुमच्या स्वयंपाकघरात सर्वत्र धोका असू शकतो. जर तुमच्या मुलाला सतत खोकला, धाप लागणे किंवा नाक चोंदण्याचा त्रास होत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे धुळीमुळे आहे, तर तुम्ही चुकत आहात, असे बालरोगतज्ज्ञ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. मौनीश बालाजी सांगतात.

यामागे खरी कारणं झुरळं आहेत. झुरळांची लाळ, त्वचा आणि विष्ठा यांमुळे मुलांना या सर्व समस्या त्रास देऊ शकतात. स्वयंपाकघर, स्नानगृह आणि भिंतींवरील भेगांमध्ये झुरळं जास्त प्रमाणात आढळतात. जिथे अन्नाचे कण किंवा कचरा असतो, तिथे झुरळांचा प्रादुर्भाव वाढतो. जागा स्वच्छ ठेवा, हवाबंद डब्यांमध्ये अन्न ठेवा. तसेच, भिंतींवरील भेगा दुरुस्त करणेही महत्त्वाचे आहे, असे डॉ. मौनीश सांगतात.

तुमच्या मुलाला वारंवार खोकला, धाप लागणे किंवा नाक चोंदण्याचा त्रास होतो का? हे हवामानामुळे किंवा धुळीमुळे होत नसेल, असे तुम्हाला वाटत असेल. पण हे झुरळांच्या ॲलर्जीमुळे होते. होय, त्यांची लाळ, त्वचेचे कण आणि विष्ठा या सर्वांमुळे ॲलर्जी होऊ शकते, असे डॉ. मौनीश यांनी 'The Little Cough Doctor' नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

घरात घ्यायची काळजी

रात्रीची सर्व भांडी स्वच्छ धुऊन ठेवा.

हवाबंद डब्यांमध्ये अन्नपदार्थ ठेवा.

अन्नाचे उरलेले कण त्वरित स्वच्छ करा.

स्वयंपाकघर आणि स्नानगृहातील भिंतींच्या भेगा बुजवा.

लक्षणे दिसल्यास त्वचेची ॲलर्जी चाचणी करा.