- Home
- Utility News
- सिडकोची मेगा हाऊसिंग लॉटरी! नवी मुंबईत प्राईम लोकेशनवर फक्त 22 लाखांत घर, आजच अर्जाची संधी
सिडकोची मेगा हाऊसिंग लॉटरी! नवी मुंबईत प्राईम लोकेशनवर फक्त 22 लाखांत घर, आजच अर्जाची संधी
CIDCO Navi Mumbai Housing Scheme : सिडकोने नवी मुंबईतील द्रोणागिरी, तळोजा, खारघर येथे EWS व LIG गटांसाठी परवडणाऱ्या घरांची बंपर लॉटरी जाहीर केली. अटल सेतूजवळ असलेल्या या घरांसाठी २१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

सिडकोची मेगा हाऊसिंग लॉटरी!
नवी मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अटल सेतू आणि आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, मुंबईशी असलेली कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ झाली आहे. याचा परिणाम घरांच्या किमतींवर झाला असला, तरीही सिडकोने सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरांची बंपर लॉटरी जाहीर केली आहे.
द्रोणागिरी नोडमध्ये स्वस्त घरांची सुवर्णसंधी
अटल सेतूपासून अगदी जवळ असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोकडून EWS आणि LIG गटातील घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
EWS फ्लॅट्सची किंमत: सुमारे 22.18 लाख रुपये
LIG फ्लॅट्सची किंमत: सुमारे 30.17 लाख रुपये
हे फ्लॅट्स सेक्टर 11 आणि सेक्टर 12 मध्ये उपलब्ध असून,
EWS फ्लॅट्सचा कारपेट एरिया: 25.81 चौ. मीटर
LIG फ्लॅट्सचा कारपेट एरिया: 29.82 चौ. मीटर आहे
तळोजा आणि खारघरमध्येही पर्याय
द्रोणागिरीसह तळोजा आणि खारघर परिसरातही सिडकोकडून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील विविध भागांत घर खरेदी करण्याची उत्तम संधी इच्छुकांना मिळत आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या हाऊसिंग योजनेसाठी 21 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक नागरिकांनी सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. cidcofcfs.cidcoindia.com
PMAY अंतर्गत अतिरिक्त लाभ
विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) पात्र ठरणाऱ्या EWS गटातील अर्जदारांना 2.50 लाख रुपयांची सब्सिडी मिळणार आहे. त्यामुळे घराची एकूण किंमत आणखी परवडणारी ठरणार आहे. स्वस्त दरात, प्राईम लोकेशनवर आणि विश्वासार्ह सरकारी संस्थेकडून घर मिळवण्याची ही संधी सर्वसामान्यांसाठी स्वप्नपूर्तीचा मार्ग ठरू शकते.
