Chewing Guava Leaves : रिकाम्या पोटी ही पाने चावून खा, होतील जबरदस्त फायदे!
Chewing Guava Leaves : पेरू खायला प्रत्येकालाच आवडतो. पण फक्त पेरूच नाही, तर तुम्ही पेरूची पानेही खाऊ शकता. ही पाने आपल्याला अनेक समस्यांपासून आराम देतात. या पानांचे आयुर्वेदातही महत्त्व सांगितले आहे. जाणून घ्या त्यांचे फायदे.

पेरूची पाने
पेरू हे एक आरोग्यदायी फळ आहे. पेरू खाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. पण पेरूची पाने खाण्याचे फायदे फार कमी लोकांना माहीत आहेत. रिकाम्या पोटी पेरूची पाने चावून खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळतो. चला तर मग, ही पाने खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असल्याचे म्हटले जाते. रिकाम्या पोटी ही पाने खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. यामुळे तुम्ही सर्दी, खोकला, व्हायरल ताप आणि इन्फेक्शनसारख्या आरोग्य समस्यांपासून दूर राहता.
हृदयाच्या आरोग्यासाठी
रिकाम्या पोटी पेरूची पाने खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. ही पाने खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही पाने फायदेशीर आहेत, कारण ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
तणाव कमी होतो
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पेरूच्या पानांमध्ये तणाव कमी करण्याचे गुणधर्मही भरपूर असतात. ही पाने स्ट्रेस आणि चिंता कमी करून मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. तणावात असताना ही पाने खाल्ल्यास शांत आणि रिलॅक्स वाटते.
वजन कमी करण्यासाठी
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठीही पेरूची पाने खूप फायदेशीर आहेत. रिकाम्या पोटी ही पाने खाल्ल्यास किंवा चहा करून प्यायल्यास वजन सहज कमी होते. तसेच, पेरूची पाने त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा चमकदार होते.

