MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • CCTV New Rules: सावधान! घरात किंवा ऑफिसमध्ये CCTV लावताय? सरकारचे 'हे' नवे नियम वाचले नाहीत, तर तुमची खासगी माहिती होईल जगाला 'लाईव्ह'!

CCTV New Rules: सावधान! घरात किंवा ऑफिसमध्ये CCTV लावताय? सरकारचे 'हे' नवे नियम वाचले नाहीत, तर तुमची खासगी माहिती होईल जगाला 'लाईव्ह'!

CCTV New Rules: वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे, केंद्र सरकारने सीसीटीव्ही सुरक्षेसाठी नवीन कडक नियम जाहीर केले आहेत. परदेशी उपकरणांमधील सुरक्षा त्रुटी आणि डेटा चोरी रोखण्यासाठी, आता प्रमाणित कॅमेरे आणि हार्डवेअर स्रोताची माहिती देणे बंधनकारक असेल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 28 2026, 04:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सावधान! घरात किंवा ऑफिसमध्ये CCTV लावताय? सरकारचे 'हे' नवे नियम वाचले नाहीत
Image Credit : our own

सावधान! घरात किंवा ऑफिसमध्ये CCTV लावताय? सरकारचे 'हे' नवे नियम वाचले नाहीत

नवी दिल्ली: आपण सुरक्षेसाठी सीसीटीव्ही (CCTV) लावतो, पण तोच सीसीटीव्ही जर तुमच्यावर हेरगिरी करू लागला तर? सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीसीटीव्ही यंत्रणेबाबत अत्यंत कडक पावले उचलली आहेत. डिजिटल सुरक्षा आणि डेटा चोरी रोखण्यासाठी सरकारने नवीन नियमावली जाहीर केली असून, याचे उल्लंघन केल्यास तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
तुमचा CCTV सुरक्षित आहे का? चिंतेचे मुख्य कारण
Image Credit : our own

तुमचा CCTV सुरक्षित आहे का? चिंतेचे मुख्य कारण

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः परदेशातून आयात केलेल्या स्वस्त उपकरणांमध्ये 'सिक्युरिटी लूपहोल्स' (सुरक्षा त्रुटी) असण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणांनी नुकत्याच उघड केलेल्या एका हेरगिरी प्रकरणाचे धागेदोरे शेजारील देशांशी संबंधित असल्याने, अनधिकृत सीसीटीव्ही नेटवर्क देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतात. 

Related Articles

Related image1
Mumbai MHADA lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट; पाहा तारीख आणि प्राईम लोकेशन्स!
Related image2
Mumbai Local Mega Block : वीकेंडला लोकल प्रवाशांना मोठा फटका! पश्चिम, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
35
सरकारचे नवीन नियम काय सांगताय?
Image Credit : our own

सरकारचे नवीन नियम काय सांगताय?

आता सीसीटीव्ही उत्पादक कंपन्या आणि वापरकर्त्यांसाठी काही तांत्रिक मानके (Technical Standards) अनिवार्य करण्यात आली आहेत.

हार्डवेअरचा स्रोत सांगणे बंधनकारक: कंपन्यांना आता त्यांच्या कॅमेऱ्यात वापरले जाणारे मुख्य भाग (Components) कुठून आणले आहेत, याची स्पष्ट माहिती द्यावी लागेल.

रिमोट कंट्रोलवर बंदी: उपकरणांची अशी तपासणी केली जाईल की, ज्यामुळे कोणताही अनोळखी व्यक्ती लांब बसून तुमचा कॅमेरा हॅक किंवा कंट्रोल करू शकणार नाही.

प्रमाणित उपकरणे: आता केवळ सरकारने प्रमाणित केलेले (Certified) कॅमेरेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील.

टेलिकॉम सुरक्षेत वाढ: सीसीटीव्हीसोबतच टेलिकॉम उपकरणांची खरेदी देखील केवळ 'विश्वासार्ह' कंपन्यांकडूनच करणे बंधनकारक केले आहे. 

45
सरकारी विभाग आणि सर्वसामान्यांसाठी सूचना
Image Credit : our own

सरकारी विभाग आणि सर्वसामान्यांसाठी सूचना

सरकारने सर्व सरकारी कार्यालयांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, त्यांनी केवळ नवीन नियमांचे पालन करणारेच कॅमेरे वापरावे. सर्वसामान्यांनीही आपले सीसीटीव्ही सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहावे. जर तुम्ही जुनी सिस्टीम वापरत असाल, तर तिची सुरक्षा तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अन्यथा हॅकर्स तुमच्या घरातील हालचालींवर नजर ठेवू शकतात. 

55
डेटा सुरक्षा हीच खरी संपत्ती
Image Credit : our own

डेटा सुरक्षा हीच खरी संपत्ती

आजच्या काळात तुमचा डेटा हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या खासगी जीवनात डोकावण्याचे प्रकार जागतिक स्तरावर घडले आहेत. हे टाळण्यासाठीच भारताने डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल उचलले आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
DMart Diwali Sale 2026 : डीमार्टमध्ये २००० रुपयांत दिवाळीची खरेदी कशी करायची?
Recommended image2
Jio Platforms IPO : जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओत एलआयसीची मोठी गुंतवणूक, ५०० कोटींचे शेअर्स घेतले
Recommended image3
Aadhaar Card Email Update : आधार कार्डला ईमेल आयडी फ्रीमध्ये कसा लिंक करायचा? ऑनलाइन अपडेटची सोपी पद्धत
Recommended image4
Herald E Bike Success Story : 3500 रुपये पगार ते 1.5 कोटींची उलाढाल... बायकोच्या बचतीतून उभारलं 'हेराल्ड ई-बाईक'चं साम्राज्य
Recommended image5
Best 5G Phones Under 10000 : 10 हजारांच्या आत मिळणारे टॉप-5 स्मार्टफोन्स; 5G फोनचे फीचर्स, किंमत
Related Stories
Recommended image1
Mumbai MHADA lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट; पाहा तारीख आणि प्राईम लोकेशन्स!
Recommended image2
Mumbai Local Mega Block : वीकेंडला लोकल प्रवाशांना मोठा फटका! पश्चिम, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved