MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai MHADA lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट; पाहा तारीख आणि प्राईम लोकेशन्स!

Mumbai MHADA lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट; पाहा तारीख आणि प्राईम लोकेशन्स!

Mumbai MHADA lottery 2026: म्हाडा मुंबईत २५०० घरांची लॉटरी जाहीर करणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. गोरेगाव, विक्रोळी, वांद्रे यांसारख्या ठिकाणी उपलब्ध असलेली ही घरे खाजगी बिल्डरांच्या तुलनेत कमी दरात मिळतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 28 2026, 03:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट
Image Credit : our own

मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट

मुंबई: स्वप्नांच्या नगरीत स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! मुंबईतील घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे हतबल झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी म्हाडा सज्ज झाली आहे. मुंबईच्या महत्त्वाच्या भागांत (Prime Locations) तब्बल २५०० घरांची सोडत जाहीर होणार असून, आता घराचं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ जवळ आली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
घरांचे स्वप्न होणार पूर्ण, कधी निघणार सोडत?
Image Credit : our own

घरांचे स्वप्न होणार पूर्ण, कधी निघणार सोडत?

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मुंबई मंडळाची ही भव्य सोडत मंगळवार, ३१ मार्च रोजी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. या मुहूर्तावर जाहिरात प्रसिद्ध करून म्हाडा मुंबईकरांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. जरी ही घरं महागडी वाटत असली, तरी खासगी बिल्डरांच्या तुलनेत मार्केट रेटपेक्षा ही घरं नक्कीच परवडणारी असतील. 

Related Articles

Related image1
नवी मुंबई विमानतळाची मोठी झेप! 29 मार्चपासून देशातील 46 शहरांशी थेट हवाई कनेक्टिव्हिटी
Related image2
Mumbai Local Mega Block : वीकेंडला लोकल प्रवाशांना मोठा फटका! पश्चिम, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
34
तुमच्या बजेटमधील घर कुठे आहे? (प्रमुख लोकेशन्स)
Image Credit : Twitter

तुमच्या बजेटमधील घर कुठे आहे? (प्रमुख लोकेशन्स)

या सोडतीमध्ये मध्यमवर्गीयांपासून ते उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

गोरेगाव (पहाडी): येथे घरांची किंमत साधारण ३२ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे, जे सर्वसामान्यांसाठी एक उत्तम संधी आहे.

विक्रोळी (कन्नमवार नगर): या ठिकाणी सर्वाधिक म्हणजेच १२२१ घरे उपलब्ध असतील. यांची अंदाजित किंमत ८० लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

वांद्रे (Bandra): अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वांद्रे येथील घरांचा या सोडतीत समावेश होणार आहे, जे या लॉटरीचे मुख्य आकर्षण ठरेल.

बोरिवली: येथील घरांचे दर १ कोटी ७ लाख ते १ कोटी ९२ लाख रुपयांच्या दरम्यान राहतील.

तुंगा, पवई: हाय-प्रोफाइल भागात घर हवे असल्यास येथे १ कोटी ३५ लाख ते १ कोटी ९८ लाख रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. 

44
मार्केटपेक्षा कमी दर, उत्तम दर्जा
Image Credit : Twitter

मार्केटपेक्षा कमी दर, उत्तम दर्जा

मुंबईतील रिअल इस्टेटचे दर पाहता, म्हाडाने दिलेले हे दर गुंतवणूक आणि निवासासाठी अत्यंत फायदेशीर मानले जात आहेत. त्यामुळे तुमची कागदपत्रे तयार ठेवा आणि ३१ मार्चच्या जाहिरातीकडे लक्ष द्या!

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Recommended image2
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट
Recommended image3
Delhi Protest : दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले- 'ही तर अघोषित आणीबाणी!'
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Related Stories
Recommended image1
नवी मुंबई विमानतळाची मोठी झेप! 29 मार्चपासून देशातील 46 शहरांशी थेट हवाई कनेक्टिव्हिटी
Recommended image2
Mumbai Local Mega Block : वीकेंडला लोकल प्रवाशांना मोठा फटका! पश्चिम, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved