सार

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. चालक या पदासाठी एकूण 50 जागांसाठी भरती होणार आहे.

 

BARC Mumbai Recruitment 2024 : नोकरीची तयारी करत असणाऱ्या उमेदवार यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र येथे विविध पदाकरिता रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. केवळ 50 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे तसेच, इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करावेत. 27 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जून 2024 आहे. भरती उमेदवारांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आपला ऑफलाईन अर्ज लवकरात लवकर करायचा आहे.

रिक्त पदाचे नाव :

चालक या पदासाठी एकूण 50 जागांसाठी भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार यांच्याकडे हेवी मोटर ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता :

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार यांनी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी भरती जाहिरात सविस्तर पहावी.

भरती उमेदवारासाठी वय मर्यादा:

भरती उमेदवार यांचे वय कमीत कमी 40 वर्षे इतके असावे

नोकरी ठिकाण :

भरती झालेल्या उमेदवारांची नोकरी ठिकाण मुंबई हे असणार आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता :

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ‘मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई-४०० ०८५ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

लिंक :

भरती उमेदवार यांच्यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर सविस्तर माहिती पहा

https://www.barc.gov.in/