सार

दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.

 

दक्षिण पूर्व रेल्वेअंतर्गत सध्या ALP, रेल्वे मॅनेजर (गुड्स गार्ड) Trains Manager (Goods Guard) या पदासाठी मोठ्या संख्येने भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा आणि अर्ज प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या. तसेच या नोकरीचा अर्ज पाठविण्यासाठी अंतिम तारीख उमेदवारांनी पाहावी.

पद आणि पद संख्या

दक्षिण पूर्व रेल्वेअंतर्गत ALP या पदासाठी एकूण ८२७ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

दक्षिण पूर्व रेल्वेअंतर्गत रेल्वे मॅनेजर या पदासाठी एकूण ३७५ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण १२०२ एकूण पदांवर दक्षिण पूर्व रेल्वेअंतर्गत भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

ALP या पदासाठी अर्ज पाठविणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शिक्षण असणे आवश्यक आहे.

NCVT/SCVT अशा मान्यताप्राप्त संस्थेमधून मॅट्रिक/एसएसएलसी आणि आयटीआयमधील आर्मेचर आणि मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ मॅट्रिक्युलेशन असे शिक्षण पूर्ण असावे. तसेच या क्षेत्रांमधील ॲप्रेन्ट्सशिप कोर्स पूर्ण असावा.

अथवा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईलमधील तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे.

रेल्वे मॅनेजर या पदासाठी अर्ज पाठविणाऱ्या उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शिक्षण असणे आवश्यक आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.

अथवा संबंधित क्षेत्रातील समतूल्य शिक्षण आवश्यक आहे.

वेतन

ALP या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास २०,२००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.

रेल्वे मॅनेजर या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास २०,२००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.

दक्षिण पूर्व रेल्वे अधिकृत वेबसाईट लिंक

https://www.rrcser.co.in/

अधिसूचना

https://appr-recruit.co.in/GTM24rrcserV1/NotificationSER24.pdf

अर्जाची लिंक

https://appr-recruit.co.in/GTM24rrcserV1/

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास त्याने तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

सामान्य वर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ४२ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

ओबीसी [OBC] वर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ४५ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

एससी / एसटी [SC/ST] वर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ४७ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

नोकरीचा अर्ज भरताना अर्जामध्ये उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे अपेक्षित आहे.

अर्धवट भरलेला अर्ज ग्राह्य मानला जाणार नाही.

उमेदवारांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने जोडावी.

अर्ज पाठविण्याआधी उमेदवारांनी अर्ज तपासून नंतर सबमिट करावा.

उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे.

नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १२ जून २०२४ अशी आहे.

वरील नोकरीच्या भरतीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्याने दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना आणि अर्जाची लिंकवर नमूद केलेली आहे.

आणखी वाचा:

NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती