सार

IAF Recruitment 2024 : भारतीय वायुसेनेत कोणत्या पदावर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. याची माहिती नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावी.

 

भारतीय वायुसेनेमध्ये ‘अग्निवीर वायु’ पदासाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येणार आहेत. या पदासाठी नोकरीचा अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, या सर्व आवश्यक बाबींबद्दल माहिती पाहा. तसेच, या नोकरीच्या अर्जाची अंतिम तारीख काय आहे हेदेखील जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता

अग्निवीर वायु पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बारावीत, किमान ५० टक्के गुणांसह गणित, इंग्रजी आणि भौतिकशास्त्राचे शिक्षण असावे.

अथवा

इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा ५० टक्क्यांसह दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स पूर्ण असावा.

या पदाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती नोकरीच्या अधिसूचनेत वाचावी.

वेतन

निवड झालेल्या अग्निवीर वायु उमेदवारांना पाहिल्या वर्षी दरमहा, ३०,०००/- रुपये वेतन देण्यात येईल. दरवर्षी या वेतनात वाढ केली जाईल.

भारतीय वायुसेना अधिकृत वेबसाइट लिंक

https://agnipathvayu.cdac.in/AV/

अधिसूचना

https://static.tnn.in/photo/msid-111047983/111047983.jpg

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वायुसेनेच्या, अग्निवीर वायु पदासाठी नोकरीचा अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीच्या अर्जासह उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

उमेदवारांना ५५०/- रुपये + GST असा अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

अर्ज केल्यानंतर, उमेदवारांची निवड ही विविध परीक्षांद्वारे करण्यात येईल.

या पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी २१ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

उमेदवारांनी वरील नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी करणे अनिवार्य आहे.

नोकरीच्या अर्जासाठी ८ जुलै २०२४ ते २८ जुलै असा कालावधी देण्यात आला आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास त्यांनी भारतीय वायुसेनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचनेची लिंक वर नमूद करण्यात आली आहे.

आणखी वाचा :

Air India Flight Metal Blade in food : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या अन्नात आढळला चक्क ब्लेडचा तुकडा