सार
Air India Flight Metal Blade in food : प्रवाशाच्या जेवणात चक्क ब्लेडचा तुकडा सापडला. या घटनेनंतर कंपनीने आपली चूक मान्य केली.
Air India Flight Metal Blade in food : विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. आता एअर इंडियाच्याविमानात एक विचित्र घटना घडली आहे. प्रवाशाच्या जेवणात चक्क ब्लेडचा तुकडा सापडला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरिअन्स ऑफिसर राजेश डोग्रा यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आणि चूक मान्य केली.
एअर इंडियाचे स्पष्टीकरण
राजेश डोगरा म्हणाले, "आमच्या एका फ्लाइटमधील प्रवाशाच्या जेवणात ब्लेडचा तुकडा आढळला. तपासणीनंतर समजले की, हा तुकडा भाजीपाला कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचा आहे. या घटनेनंतर आम्ही भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
न शिजवलेले अन्न दिल्याचा प्रवाशाचा आरोप
यापूर्वी एअर इंडियाच्या नवी दिल्ली-न्यूयॉर्क फ्लाइटच्या 'बिझनेस' क्लासमधील एका प्रवाशाने कंपनीवर न शिजवलेले अन्न दिल्याचा आरोप केला आहे. त्याने 'एक्स'वर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. तर, दुसऱ्या एका घटनेत प्रवाशाने फ्लाइटमधील 35 पैकी किमान 5 सीट बसण्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले. पण, अद्याप कंपनीकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आणखी वाचा :