सार

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे, याची नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती पाहावी.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक अशा अनेक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष या सर्व आवश्यक गोष्टींची माहिती पाहावी. या नोकरीसाठी अर्ज कसा करावा व अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख काय हेदेखील जाणून घ्यावे.

पद आणि पदसंख्या

विविध इंजिनियर [engineering] पदासाठी एकूण १४८ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

विविध वरिष्ठ अधिकारी [senior officer] पदासाठी एकूण २४ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

विविध व्यवस्थापक [manager] पदासाठी एकूण पाच रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त चार्टर्ड अकाउंटंट, क्वॉलिटी कंट्रोल अधिकारी, आयएस अधिकारी या पदांसाठी मिळून ६० रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण २४७ रिक्त पदांवर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेची अचूक माहिती ही नोकरीच्या अधिसूचनेत दिलेली आहे. नोकरीच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती वाचावी.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाइट लिंक

https://www.hindustanpetroleum.com/

अधिसूचना लिंक

https://www.hindustanpetroleum.com/doc

वरील सर्व पदांसंबंधी अधिक माहिती घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचनेची लिंकवर नमूद करण्यात आली आहे.