MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Car Market: भारतात येणार नव्या ऑल-व्हील ड्राइव्ह SUV! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Car Market: भारतात येणार नव्या ऑल-व्हील ड्राइव्ह SUV! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Car Market: पुढील काही महिन्यांमध्ये भारतात ऑल-व्हील ड्राइव्ह आणि 4X4 SUV गाड्यांची संख्या वाढणार आहे. या गाड्यांची वैशिष्ट्ये, इंजिनची माहिती आणि अपेक्षित किंमत काय असेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 20 2026, 09:11 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नव्या ऑल व्हील ड्राइव्ह SUV लाँच होणार
Image Credit : X

नव्या ऑल-व्हील ड्राइव्ह SUV लाँच होणार

भारतात आता ऑल-व्हील ड्राइव्ह आणि खास 4X4 सिस्टीम असलेल्या SUV गाड्यांची क्रेझ वाढत आहे. तुम्हीही ऑफ-रोडिंगचे शौकीन असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच भारतात अनेक नव्या ऑल-व्हील ड्राइव्ह SUV लाँच होणार आहेत. चला पाहूया कोणत्या आहेत या गाड्या.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
महिंद्रा स्कॉर्पिओ-N फेसलिफ्ट 4X4
Image Credit : Mahindra

महिंद्रा स्कॉर्पिओ-N फेसलिफ्ट 4X4

महिंद्रा कंपनी यावर्षी ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त स्कॉर्पिओ-एन फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच करणार आहे. या गाडीचं एक्सटीरियर डिझाइन अपडेट केलं जाईल आणि अनेक नवीन प्रीमियम फीचर्स दिले जातील. सध्याच्या मॉडेलप्रमाणेच यात 4XPLOR 4X4 सिस्टीम असेल, ज्यात शिफ्ट-ऑन-द-फ्लाय 4WD, लो-रेंज गिअरबॉक्स आणि 4XPLOR टेरेन मोड (स्नो, सँड, मड, नॉर्मल) मिळतील. याची किंमत 13.80 लाख ते 24.80 लाख रुपयांपर्यंत असू शकते. याच्या 4X4 व्हेरियंटमध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिन असेल, जे 172 bhp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करेल. लेव्हल 2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल 10.25-इंच स्क्रीन ही याची इतर प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

Related Articles

Related image1
Mahindra BE 07: टाटा हॅरियर EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची नवी इलेक्ट्रिक SUV, 2027 मध्ये होणार लाँच!
Related image2
Mahindra EV Discount: गाड्यांवर ऑफर्सचा पाऊस, मिळतोय 4 लाखांपर्यंत डिस्काउंट!
35
महिंद्रा थार फेसलिफ्ट 4×4
Image Credit : RushLane

महिंद्रा थार फेसलिफ्ट 4×4

ऑगस्ट 2026 मध्ये स्कॉर्पिओ-एनच्या लाँचिंगवेळीच महिंद्रा कंपनी थारच्या थ्री-डोअर मॉडेलची फेसलिफ्ट व्हर्जनही लाँच करेल. यात 'थार रॉक्स' (Thar Roxx) मॉडेलप्रमाणे फ्रंट ग्रिल आणि अलॉय व्हील्स असतील. 4X4 सिस्टीम आणि इंजिन सध्याच्या मॉडेलप्रमाणेच राहतील. यात 132 bhp क्षमतेचं 2.2 लीटर डिझेल इंजिन आणि 152 bhp क्षमतेचं 2.0 लीटर पेट्रोल इंजिन पर्याय असतील. थार थ्री-डोअर फेसलिफ्टच्या 4X4 मॉडेलची किंमत 15 लाख ते 18 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

45
एमजी मजेस्टर 4×4
Image Credit : X/MadridMotorS

एमजी मजेस्टर 4×4

एमजी इंडिया या महिन्याच्या अखेरीस मजेस्टर D+ सेगमेंट SUV भारतात लाँच करणार आहे. याची किंमत 45 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या लॅडर-फ्रेम मजेस्टरमध्ये ट्रिपल डिफरेंशियल लॉक्स (फ्रंट, रिअर आणि सेंटर), 10 टेरेन मोड्स आणि क्रॉल कंट्रोल (M-Crawl) यासह एक खास 4X4 सिस्टीम असेल. यात 2.0-लीटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन आहे, जे 215 bhp पॉवर आणि 478 Nm टॉर्क निर्माण करतं. याची वॉटर-वेडिंग क्षमता 810 मिमी आहे. म्हणजे, आपल्याकडे गुडघाभर पाणी साचलं तरी ही गाडी आरामात निघून जाईल.

55
टाटा सिएरा EV AWD
Image Credit : TATA Motors Website

टाटा सिएरा EV AWD

टाटा मोटर्सने नुकत्याच सादर केलेल्या मिड-साइज SUV सिएराची इलेक्ट्रिक आवृत्ती पुढच्या महिन्यात लाँच करण्याची तयारी करत आहे. आगामी सिएरा EV ची किंमत 18 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. यात ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टीम असेल, अशी माहिती समोर आली आहे. याची बॅटरी पॅक 65 ते 75 kWh पर्यंत असू शकते. एका चार्जमध्ये ही गाडी 450 ते 500+ किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
ऑटोमोबाईल

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Train Wheels : ट्रेनची चाकं किती दिवसांनी घासली जातात? ती कधी बदलतात?
Recommended image2
Budget Automatic Cars : 5 लाखांच्या आत ऑटोमॅटिक कार शोधताय? या हॅचबॅक कार्स नक्की पाहा
Recommended image3
Diwali Bonus Investment : दिवाळीच्या बोनसचे पैसे या पद्धतीने गुंतवा, अडीअडचणींना येतील कामी
Recommended image4
Study Abroad : कमी खर्चात परदेशात शिक्षण घ्यायचंय? या देशांचा नक्की विचार करा
Recommended image5
UPI Payments : डिजिटल जगात खर्च वाढलाय? या सोप्या टिप्स वापरा आणि पैशांची बचत करा
Related Stories
Recommended image1
Mahindra BE 07: टाटा हॅरियर EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची नवी इलेक्ट्रिक SUV, 2027 मध्ये होणार लाँच!
Recommended image2
Mahindra EV Discount: गाड्यांवर ऑफर्सचा पाऊस, मिळतोय 4 लाखांपर्यंत डिस्काउंट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved