Car Market: बजेटमध्ये कार घ्यायचीय? रेनॉ देत आहे ₹80,000 पर्यंत बंपर डिस्काउंट!
Car Market: रेनॉ इंडियाने मार्च 2026 साठी आपल्या गाड्यांवर जबरदस्त डिस्काउंट जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी विक्री वाढवण्यासाठी कंपनीने या खास सवलती आणल्या आहेत. काय आहेत या सवलती जाणून घेऊयात या लेखात
15

Image Credit : Asianet News
रेनॉच्या मार्च 2026 साठी खास डिस्काउंट ऑफर्स
रेनॉने मार्च 2026 साठी खास डिस्काउंट ऑफर्स जाहीर करून ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या ऑफरमुळे रेनॉच्या गाड्यांवर ₹70,000 ते ₹80,000 पर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी विक्री वाढवणं हा यामागे कंपनीचा उद्देश आहे.
25
Image Credit : renault
रेनॉ क्विड, ट्रायबर आणि कायगर या मॉडेल्सवर ऑफर्स
या ऑफरमध्ये रेनॉ क्विड, ट्रायबर आणि कायगर या मॉडेल्सचा प्रामुख्याने समावेश आहे. क्विडवर ₹70,000 पर्यंत सूट मिळत आहे, तर ट्रायबर आणि कायगरवर ₹80,000 पर्यंतचे फायदे दिले जात आहेत. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी ऑफर्सचा समावेश आहे.
35
Image Credit : Asianet News
रेनॉ क्विड
रेनॉ क्विड ही भारतातील सर्वात स्वस्त गाड्यांपैकी एक आहे. 1.0-लीटर पेट्रोल इंजिनसह येणारी ही कार शहरातल्या प्रवासासाठी उत्तम आहे. मार्चच्या ऑफरमध्ये यावर ₹70,000 पर्यंत सूट मिळत असल्याने, पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
45
Image Credit : Google
रेनॉ ट्रायबर
रेनॉ ट्रायबर ही एक 7-सीटर MPV असून मोठ्या कुटुंबांसाठी उत्तम आहे. यातही 1.0-लीटर इंजिन आहे. या मॉडेलवर ₹80,000 पर्यंतचे फायदे मिळत असल्याने, कमी किमतीत जास्त सुविधा मिळतात. त्यामुळे ट्रायबर हा एक 'व्हॅल्यू फॉर मनी' पर्याय ठरतो.
55
Image Credit : Asianet News
रेनॉ कायगर
रेनॉ कायगर हे सब-4 मीटर SUV सेगमेंटमधील एक लोकप्रिय मॉडेल आहे. स्टायलिश डिझाइन आणि अनेक फीचर्ससह येणारी ही कार पेट्रोल आणि टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यावर ₹80,000 पर्यंत सूट मिळत असल्याने ही SUV आणखी स्वस्तात मिळत आहे. एकूणच, कमी बजेटमध्ये नवीन कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी रेनॉची ही ऑफर एक उत्तम संधी आहे.

