जपानी ब्रँड होंडाने आपली एसयूव्ही एलिव्हेटच्या किमतीत वाढ केली आहे. ही दरवाढ 5.5 टक्क्यांपर्यंत असून, व्हेरियंटनुसार 59,990 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आता ही दरवाढ ग्राहक स्वीकारतील का, हे पाहावे लागेल. अन्यथा कंपनीच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो.
Car market : भारतात मोटार आणि दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहनविक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर कार उत्पादक कंपन्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आरामदायी मॉडेल्स तयार करून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याशिवाय, जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मारुती, टाटा, ह्युंदाई यासारख्या कंपन्यांनी विविध मॉडेल्सवर सवलती जाहीर केल्या आहेत. तर, दुसरीकडे जपानी ब्रँड असलेल्या होंडाने मात्र वेगळाच निर्णय घेतला आहे.
होंडाने आपली एकमेव एसयूव्ही होंडा एलिव्हेटची किंमत वाढवली आहे. कंपनीने या एसयूव्हीच्या किमतीत 5.5 टक्क्यांनी वाढ केली आहे. हा निर्णय खरेदीदारांसाठी मोठा धक्का आहे. जर तुम्ही ह्युंदाई क्रेटाची प्रतिस्पर्धी असलेली ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला 59,990 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. होंडा एलिव्हेट SV, V, VX आणि ZX व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. SV व्हेरियंटमध्ये सर्वाधिक दरवाढ झाली आहे.
भारतातील होंडा एलिव्हेटची किंमत
या होंडा एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत पूर्वी 10.99 लाख रुपयांपासून सुरू होत होती. पण आता या कारच्या बेस व्हेरियंटसाठी तुम्हाला 11.59 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत मोजावी लागेल. म्हणजेच, या कारच्या बेस व्हेरियंटसाठी तुम्हाला 59,990 रुपये जास्त खर्च करावे लागतील.
V ग्रेडची किंमत आता 9,990 रुपयांनी (एक्स-शोरूम) वाढली आहे, मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 12.06 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 13.22 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. VX ग्रेडच्या किमतीत 13,590 रुपयांची (एक्स-शोरूम) वाढ झाली आहे, मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 13.75 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 14.91 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
ZX ग्रेडची किंमत 9,990 रुपयांनी (एक्स-शोरूम) वाढली आहे, आता मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 14.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 16.16 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ब्लॅक एडिशनची किंमत 9,990 रुपयांनी (एक्स-शोरूम) वाढली आहे, मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 15.07 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 16.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे.
ADV एडिशनच्या किमतीत 9,990 रुपयांची (एक्स-शोरूम) वाढ झाली आहे, मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 15.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 16.57 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
होंडा एलिव्हेटचे स्पर्धक
या किमतीच्या श्रेणीत, ही एसयूव्ही नवीन किया सेल्टोस, फोक्सवॅगन टायगुन, ह्युंदाई क्रेटा आणि स्कोडा कुशाक यांसारख्या वाहनांना जोरदार टक्कर देईल.


