Car Dashboard Lights: गाडी चालवताना या लाइट्सकडे दुर्लक्ष नको! जाणून घ्या कारणे
Car Dashboard Lights: आजकालच्या नवीन गाड्यांमध्ये डॅशबोर्डवर दिसणारे वॉर्निंग लाइट्स फक्त डिझाइनसाठी नसतात. ते तुमच्या गाडीच्या आरोग्याबद्दल वेळीच कल्पना देतात. पण अनेक ड्रायव्हर्स या महत्त्वाच्या इशाऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष करतात.
14

Image Credit : Asianet News
डॅशबोर्ड लाइट्सच्या रंगांचा अर्थ काय?
लाल (Red):
हा सर्वात गंभीर इशारा आहे. याचा अर्थ इंजिन ऑइल, ब्रेक सिस्टीम किंवा इंजिनच्या तापमानात मोठी समस्या असू शकते. हा लाइट लागल्यास, गाडी शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी थांबवून तपासावी.
पिवळा/नारंगी (Amber):
हा एक धोक्याचा इशारा आहे. तुम्ही गाडी चालवू शकता, पण समस्येकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी दाखवणे महत्त्वाचे आहे.
हिरवा/निळा (Green/Blue):
हे लाइट्स फक्त माहिती देण्यासाठी असतात. जसं की, हेडलाइट, क्रूझ कंट्रोल किंवा इतर फीचर्स चालू आहेत हे यातून कळतं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

24
Image Credit : Asianet News
सर्वात जास्त दिसणारे 7 महत्त्वाचे वॉर्निंग लाइट्स
1. Check Engine Light
हा लाइट इंजिन किंवा एमिशन सिस्टीममधील बिघाड दाखवतो. कधीकधी पेट्रोलची टाकीची कॅप नीट न लावल्यासही हा लाइट लागतो.
2. Oil Pressure Light
याचा अर्थ इंजिनला पुरेसं ऑइल मिळत नाहीये. ऑइल कमी झाल्यास किंवा ऑइल पंपात बिघाड झाल्यास हा लाइट दिसतो.
3. Coolant Temperature Light
हा लाइट सांगतो की इंजिन गरजेपेक्षा जास्त गरम होत आहे. कूलंट गळती किंवा रेडिएटरमध्ये समस्या असल्यास असं होतं. अशावेळी गाडी लगेच थांबवून इंजिन थंड होऊ द्यावं.
34
Image Credit : Asianet News
वॉर्निंग लाइट्स
4. Battery Warning Light
हा लाइट बॅटरी, अल्टरनेटर किंवा चार्जिंग सिस्टीममधील समस्या दर्शवतो. हा लाइट लागल्यास, गाडी काही वेळातच बंद पडू शकते.
5. Brake Warning Light
ब्रेक फ्लुइड कमी झाल्यास किंवा ब्रेक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यास हा लाइट लागतो. हा थेट सुरक्षेशी संबंधित असल्याने, याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
6. Tyre Pressure Light (TPMS)
एक किंवा अधिक टायरमधील हवेचा दाब कमी झाल्यास हा लाइट लागतो. कमी हवेमुळे मायलेज घटतं आणि टायर फुटण्याचा धोकाही वाढतो.
7. ABS Light
याचा अर्थ अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) नीट काम करत नाहीये. नॉर्मल ब्रेक लागतो, पण अचानक ब्रेक लावल्यास गाडी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
44
Image Credit : Asianet News
आणखी काही महत्त्वाचे वॉर्निंग लाइट्स
Airbag Warning Light – एअरबॅग सिस्टीममध्ये काहीतरी बिघाड आहे.
Power Steering Warning Light – स्टिअरिंग फिरवायला जड होऊ शकतं.
Fuel Warning Light – गाडीतलं इंधन खूप कमी झालं आहे.
Door Open Warning – गाडीचा दरवाजा नीट बंद नाही.
Seat Belt Reminder – सीट बेल्ट लावलेला नाही.
याकडे दुर्लक्ष का करू नये?
एका छोट्या वॉर्निंग लाइटला दुर्लक्षित केल्यास भविष्यात हजारो किंवा लाखो रुपयांचा खर्च येऊ शकतो. उदाहरणार्थ, ऑइल लाइट लागल्यावरही गाडी चालवल्यास इंजिन सीझ होऊ शकतं. तर ब्रेक लाइट दुर्लक्षित केल्यास मोठा अपघात होऊ शकतो.

