मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची भूमिका खूप पूर्वीपासून सिद्ध झाली आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना आहाराबाबतच सर्वाधिक शंका असतात. डायबिटीस रुग्णांनी भात खावा की नको.याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, ते पाहूया.

 रक्तातील साखरेची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या स्थितीला मधुमेह म्हणतात. मधुमेह हा आजारापेक्षा जीवनशैलीशी संबंधित एक अनारोग्यकारक स्थिती म्हणून ओळखला जातो. मधुमेही रुग्णांना आहारात भात द्यावा का? हा अनेकांचा प्रश्न असतो.पण तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रकारचा भात आणि नियंत्रित प्रमाणात सेवन केल्यास मधुमेह असतानाही भात खाणे शक्य आहे.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची भूमिका खूप पूर्वीपासून सिद्ध झाली आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना आहाराबाबतच सर्वाधिक शंका असतात. 
साधारणपणे मधुमेही रुग्णांनी कमी कर्बोदके आणि जास्त पोषक तत्वे असलेला आहार घ्यावा. तसेच, मधुमेही रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निवडले पाहिजेत. 

आपल्याकडे भात हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे, त्यामुळे मधुमेही रुग्ण भात खाऊ शकतात की नाही याबाबत शंका असू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढेल या भीतीने मधुमेही रुग्ण भात पूर्णपणे टाळतात. पण तज्ज्ञांच्या मते, भात पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. मात्र, भात खाताना त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

त्याचप्रमाणे, पांढऱ्या तांदळापेक्षा हातसडीचा किंवा ब्राऊन राईस खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. ब्राऊन राईसमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे असतात. त्यात कोंडा असल्याने फायबरचे प्रमाणही जास्त असते. जेव्हा आपण भात खातो, तेव्हा फायबरमुळे कर्बोदकांचे वेगाने शोषण होऊन त्याचे रूपांतर चरबीत होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल तांदूळ मधुमेहावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पांढऱ्या तांदळात भरपूर कार्बोहायड्रेट्स असल्याने मधुमेही रुग्णांनी तो प्रमाणातच खावा. 

हे पण वाचा: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे आठ पदार्थ...