- Home
- Utility News
- BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
BSF Sports Quota Bharti 2025 : सीमा सुरक्षा दलाने (BSF) कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांसाठी 549 जागांची भरती जाहीर केली आहे. 10वी उत्तीर्ण आणि क्रीडा कौशल्य असलेले उमेदवार 27 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी!
BSF Sports Quota Bharti 2025 : देशसेवा करण्याची आणि आपल्या क्रीडा कौशल्याचा उपयोग करण्याची सुवर्णसंधी! सीमा सुरक्षा दलामध्ये (Border Security Force – BSF) कॉन्स्टेबल GD (खेळाडू – Sports Quota) पदासाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 549 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू: 27 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
वयाची अट
अर्जदाराचे वय 01 ऑगस्ट 2025 पर्यंत 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक.
अनुसूचित जाती- जमाती: +5 वर्षे सवलत
इतर मागासवर्गीय उमेदवार: +3 वर्षे सवलत
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संबंधित खेळात प्रमाणित पात्रता आणि कौशल्य असणे अनिवार्य.
कोणत्या खेळाचे ज्ञान आवश्यक आहे, ते जाहिरातीत तपशीलवार दिले आहे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग / इतर मागासवर्गीय: ₹159
अनुसूचित जाती- जमाती आणि महिला उमेदवारांसाठी: मोफत
वेतन आणि भत्ते
लेव्हल 3 प्रमाणे मासिक वेतन: ₹21,700 ते ₹69,100
यासोबत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व भत्ते व सुविधा लागू होतील.
ही नोकरी संधी केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर देशसेवा करण्याचा एक अनमोल मार्ग देखील आहे. इच्छुक उमेदवारांनी 27 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करून आपली पात्रता तपासणे आवश्यक आहे.

