- Home
- Utility News
- सावधान! या आठवड्यात ७ पैकी ६ दिवस बँका राहणार बंद; खिशाला कात्री लागण्यापूर्वीच उरका आपली कामे!
सावधान! या आठवड्यात ७ पैकी ६ दिवस बँका राहणार बंद; खिशाला कात्री लागण्यापूर्वीच उरका आपली कामे!
Bank Holidays in December 2025 : डिसेंबर २०२५ मध्ये ख्रिसमस आणि इतर सणांमुळे बँकांना अनेक सुट्ट्या आहेत, काही राज्यांमध्ये तर सलग ५ ते ६ दिवस कामकाज बंद राहील. या लेखात डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी दिली आहे.

या आठवड्यात ७ पैकी ६ दिवस बँका राहणार बंद
Bank Holidays in December 2025: सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, डिसेंबर महिना आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमची बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे शिल्लक असतील, तर ती लगेच उरकून घ्या. कारण, सोमवार २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या नवीन आठवड्यात देशातील बँकांना मोठी सुट्टी असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग ५ ते ६ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
डिसेंबरमध्ये एकूण १९ दिवस बँकांचे टाळे
२०२५ च्या शेवटच्या महिन्यात रविवार आणि शनिवारच्या सुट्ट्या मिळून एकूण १९ दिवस बँका बंद राहणार आहेत. यात ४ रविवार आणि २ शनिवार (दुसरा व चौथा) यांचा समावेश आहे. याशिवाय, विविध राज्यांतील स्थानिक सणांमुळे १३ अतिरिक्त सुट्ट्या आहेत. या आठवड्यात २५ डिसेंबरला ख्रिसमस, २७ ला चौथा शनिवार आणि २८ ला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
या आठवड्यातील सुट्ट्यांचे सविस्तर वेळापत्रक
बँकेत जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील सुट्ट्यांची ही यादी नक्की तपासा
२२ डिसेंबर (सोमवार): 'लोसूंग/नामसूंग' निमित्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
२४ डिसेंबर (बुधवार): ख्रिसमस ईव्ह निमित्त मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये बँकांना सुट्टी असेल.
२५ डिसेंबर (गुरुवार): ख्रिसमस (नाताळ) निमित्त संपूर्ण देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
२६ डिसेंबर (शुक्रवार): ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये बँकांचे कामकाज बंद असेल.
२७ डिसेंबर (शनिवार): चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. (नागालँडमध्ये स्थानिक सुट्टीही आहे).
२८ डिसेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद असतील.
या राज्यांमध्ये सलग ५ दिवस बँका बंद!
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सुट्ट्यांचा मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. मिझोराम, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये २४ ते २८ डिसेंबर दरम्यान सलग ५ दिवस बँकांचे कामकाज होणार नाही. मेघालयमध्ये तर २९ तारखेला बँका उघडतील आणि पुन्हा ३० तारखेला स्थानिक सुट्टीमुळे बंद राहतील.
महत्त्वाची टीप
बँका बंद असल्या तरी ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग आणि एटीएम (ATM) सेवा सुरू राहतील. मात्र, चेक क्लिअरन्स किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करायची कामे अडकू शकतात, त्यामुळे नियोजित कामे वेळीच पूर्ण करा.

